NCP News : राष्ट्रवादीचे दोन किल्ले, एकाच दिवशी शक्तिप्रदर्शन! पुण्यात 10 जूनला 'पवार वि. पवार'
NCP Latest News : अजित पवार गटाचा बालेवाडीत मेगा जलसा; 15 हजार कार्यकर्त्यांची हजेरी,शरद पवारांचे बालगंधर्ववर प्रत्युत्तर; "खरी राष्ट्रवादी" कोण, यावरच लढाई
1 मिनट पठन

NCP Latest News : अजित पवार गटाचा बालेवाडीत मेगा जलसा; 15 हजार कार्यकर्त्यांची हजेरी,शरद पवारांचे बालगंधर्ववर प्रत्युत्तर; "खरी राष्ट्रवादी" कोण, यावरच लढाई
पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला 26 वर्षे पूर्ण होत असताना, यंदा पुण्यात 10 जून हा दिवस ‘शक्ती, प्रतिष्ठा आणि नियंत्रण’ यांचा निर्णायक सामना ठरणार आहे. पक्ष फाटल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही गट आपापल्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा करत असून, "एक पक्ष – दोन मैदानं – दोन पवार!" हे दृश्य पुणेकर पाहणार आहेत. NCP Latest News
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा Ajit Pawar गट बालेवाडी स्टेडियममध्ये भव्य जलसा भरवणार असून, राज्यभरातून तब्बल 15 हजार कार्यकर्त्यांची गर्दी अपेक्षित आहे. दुसरीकडे, शरद पवार Sharad Pawar यांच्या गटाने बालगंधर्व रंगमंदिरात ठामपणे आपली हजेरी लावण्याची तयारी केली आहे.
दोन्ही गटांनी वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याची रणनीती आखली आहे. या दोन मंचांवरून दोन पवार आपापल्या समर्थकांसमोर भाषण करताना, अप्रत्यक्षपणे एकमेकांवर निशाणा साधण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या दिवशी राष्ट्रवादी कोणाची, हे ठरवण्यासाठी मैदानात केवळ नेते नव्हे, तर भावना, इतिहास आणि भविष्यातील दावे समोर येणार आहेत. त्यामुळे 10 जून हा दिवस फक्त वर्धापन दिनापुरता न राहता, पुढील निवडणूक रेषेवर परिणाम करणारा ठरू शकतो.
- #NCP reunion
- #Maharashtra political updates
- #Ajit Pawar Group
- #NCP power show June 10
- #Sharad Pawar address
- #NCP unity speculation
- #पुणे
- #Pune political event
- #power display NCP
- #Pawar faction updates
- #राष्ट्रवादी कांग्रेस
- #Pune rally June 10
- #Ajit Pawar Latest News
- #Ajit Pawar rally
- #NCP foundation day Pune
- #NCP political future
- #शरद पवार
- #Sharad Pawar NCP event
- #NCP leadership battle
- #Pune political gathering
- #Sharad Pawar Group
- #NCP factions unity
- #political showdown Pune
- #party merger talks
- #Maharashtra party politics
- #Maharashtra politics
- #NCP merger news
- #NCP foundation day 2024
- #Ajit Pawar Sharad Pawar
- #अजित पवार
- #political alliance Maharashtra
