Pimpri News : आजीचा खून करून नातू पोलीस ठाण्यात हजर
Pimpri News :पिंपरी, महाराष्ट्र मिरर : प्रॉपर्टीमधील हिस्सा देत नसल्याने सावत्र नातवाने आजीचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
1 मिनट पठन

Pimpri News : प्रॉपर्टीमधील हिस्सा देत नसल्याच्या रागातून केला खून
Pimpri News :पिंपरी, महाराष्ट्र मिरर : प्रॉपर्टीमधील हिस्सा देत नसल्याने सावत्र नातवाने आजीचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आजीचा खून केल्यानंतर नातू स्वतः सांगवी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने खुनाबाबतची माहिती पोलिसांना दिली. ही घटना शुक्रवारी (९ ऑक्टोबर) सकाळी नऊच्या सुमारास क्रांती चौक, नवी सांगवी येथील शिंगोरे बिल्डिंग मध्ये घडली.https://maharashtramirror.com/ pimpri News
मंगल बाबुराव शिंगोरे (६०, क्रांती चौक, नवी सांगवी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ओंकार किसान शिंगोरे (२६) असे आरोपी नातवाचे नाव आहे. याप्रकरणी मंगल यांच्या ३८ वर्षीय मुलीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओंकार हा मंगल शिंगोरे यांच्या सावत्र मुलाचा मुलगा आहे. तो पिंपळे गुरव येथे राहत होता. मंगल या त्यांच्या प्रॉपर्टी मधील हिस्सा ओंकार याला देत नसल्याचा राग त्याच्या मनात होता. मंगल या शुक्रवारी सकाळी त्यांच्या घरी असताना ओंकार तिथे आला. त्याने प्रॉपर्टी देत नसल्याच्या रागातून मंगल यांच्यावर चाकूने वार केले. त्यात मंगल यांचा मृत्यू झाला.
आजीचा खून केल्यानंतर ओंकार स्वतःहून सांगवी पोलीस ठाण्यात आला. त्याने त्याच्या आजीचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेची खातरजमा करत ओंकार याला ताब्यात घेतले. ओंकार याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सांगवी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.
