Navi Mumbai : नवी मुंबई पोलिसांचा अंमली पदार्थ तस्करांना दणका; वाशी हायवेवर 10 किलो गांजासह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त
Navi Mumbai Police Latest News : पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणांतर्गत धडक कारवाई; 17 वर्षीय विधीसंघर्ष बालकाला घेतले ताब्यात
2 मिनट पठन

Navi Mumbai Police Latest News : पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणांतर्गत धडक कारवाई; 17 वर्षीय विधीसंघर्ष बालकाला घेतले ताब्यात
नवी मुंबई :- नवी मुंबई शहरात अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक पावले उचलली असून, वाशी पोलिसांनी सायन-पनवेल हायवेवर मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत पोलिसांनी सुमारे 10 किलो 100 ग्रॅम 'गांजा' जप्त केला असून, 17 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
नेमकी घटना आणि पोलिसांची सतर्कता
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत वाशी पोलीस ठाण्याचे गुन्हे Vashi Police Station प्रकटीकरण पथक 19 मार्च 2026 रोजी रात्री वाशी हायवेवर गस्त घालत होते. रात्रीच्या सुमारास वाशी प्लाझा पुलावरून उतरल्यानंतर 'शालोम ट्रेडर्स' जवळ एक संशयास्पद मारुती कार (MH 47 BY 7663) उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
फिल्मी स्टाईल पाठलाग आणि जप्ती
पोलिसांनी गाडीची तपासणी सुरू केली असता, चालक बाजूला बसलेला 22 वर्षीय तरुण पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेत पळून गेला. मात्र, पोलिसांनी गाडीतील 17 वर्षीय विधीसंघर्ष बालकाला जागीच ताब्यात घेतले. गाडीच्या मागील सीटवर असलेल्या जांभळ्या रंगाच्या बॅगेची झडती घेतली असता, त्यात खाकी टेपने गुंडाळलेली 10 पाकिटे आढळली, ज्यामध्ये उग्र वासाचा 'गांजा' होता.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण 17 लाख हुन अधिक रुपये):
गांजा: 12 लाख 66 हजार 450 रुपये किमतीचा 10 किलो 130 ग्रॅम गांजा.
वाहन: 5 लाख रुपये किंमतीची मारुती कार (MH 47 BY 7663).
मोबाईल: 30,000 रुपये किंमतीचे सॅमसंग आणि रियलमी कंपनीचे दोन फोन.
गुन्हा दाखल आणि तपास
याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा 1985 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळून गेलेल्या मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत.
तपास पथक
ही यशस्वी कामगिरी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त आतिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) जहाँगीर मुलाणी, पोउपनि सांगळे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. विशेषतः गस्त घालणारे पोलीस शिपाई अरविंद चौगुले आणि महेश घोडके यांच्या सतर्कतेमुळे हा तस्करीचा प्रकार उघडकीस आला.
