मुख्य सामग्री पर जाएँ

Mumbai News : 'नवी मुंबई पोलिसांची ड्रग्जविरोधात मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस' तर बवंडर टोळीवर 'मोक्का'!'

Mumbai News :नवी मुंबई :- नवी मुंबई परिसरामध्ये अमली पदार्थांच्या विक्रीत वारंवार सहभागी होणाऱ्या आरोपींविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

'नवी मुंबई पोलिसांची ड्रग्जविरोधात मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस' तर बवंडर टोळीवर 'मोक्का'!'
'नवी मुंबई पोलिसांची ड्रग्जविरोधात मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस' तर बवंडर टोळीवर 'मोक्का'!'

Mumbai News :'सीताबाई इंगळे नाशिक कारागृहात स्थानबद्ध, 86 लाखांच्या एमडी तस्करांना दणका; 'कॅम्पस कनेक्ट'द्वारे जनजागृती'

Mumbai News :नवी मुंबई :- नवी मुंबई परिसरामध्ये अमली पदार्थांच्या विक्रीत वारंवार सहभागी होणाऱ्या आरोपींविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नेरुळ येथे राहणाऱ्या सीताबाई इंगळे या महिला तस्करावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल होऊनही तिच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार तिला 'पीट एनडीपीएस' (PIT NDPS) कायद्यान्वये एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासातील ही पहिलीच 'पीट एनडीपीएस' कारवाई असल्याचे परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ mumbai news

86 लाखांच्या 'एमडी' तस्कर इमरान खान उर्फ 'बवंडर' आणि 7 साथीदारांवर 'मोक्का'

दुसऱ्या एका मोठ्या कारवाईत, उलवे परिसरातून मुंबई, नवी मुंबई आणि नाशिक भागात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या टोळीचा प्रमुख इमरान हुसेन खान ऊर्फ बवंडर याच्यासह त्याच्या सात साथीदारांविरोधात 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये' (मोक्का - MCOCA) अंतर्गत् कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेने या टोळीकडून 86 लाख रुपये किमतीचा 344 ग्रॅम 'एमडी' (MD) हा अमली पदार्थ जप्त केला होता. मोक्काचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या टोळीतील सर्व आरोपी सध्या मध्यवर्ती कारागृहात आहेत.https://maharashtramirror.com/ Mumbai news

सराईत तस्करांची यादी तयार; 'कॅम्पस कनेक्ट'द्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता

जामिनावर बाहेर येऊन पुन्हा अमली पदार्थांच्या तस्करीचा धंदा सुरू करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची विशेष यादी पोलिसांनी तयार केली असून त्यांच्यावरही अशीच कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. केवळ कारवाईवर न थांबता, महाविद्यालयीन तरुण आणि विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या वतीने ‘कॅम्पस कनेक्ट’ उपक्रम राबवून विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें