मुख्य सामग्री पर जाएँ

Navi Mumbai Crime News : नेरुळ हद्दीत अवैध धंद्यांना 'नो एन्ट्री' : वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाईकवाडी यांच्या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत

रात्र गस्त वाढविल्याने गुन्हेगारी कृत्यांना आळा, पोलीस दलाची प्रतिमा उंचावली

म
मुबारक

1 मिनट पठन

navi mumbai crime news

  • रात्र गस्त वाढविल्याने गुन्हेगारी कृत्यांना आळा, पोलीस दलाची प्रतिमा उंचावली
  • नेरुळ, दि. २६ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर

    Navi Mumbai Crime News

    नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील नेरुळ पोलीस हद्दीत अवैध धंद्यांना 'नो एंट्री' करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे ( IPS Milind Bharambe, CP Navi Mumbai) यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडक उपाय योजना अंमलात आणण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेशित केले होते. नेरुळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी (Bramhanand Ravsaheb Naikwadi, Senior Police Inspector) यांनी पोलीस आयुक्तांच्या भूमिकेला साद देत हद्दीत अवैध धंद्यांना 'नो एन्ट्री' केल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस निरीक्षकांच्या कणखर भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नवी मुंबई पोलीस दलाची प्रतिमा व विश्वासहर्ता उंचावली आहे.

    navi mumbai crime news

    अवैध धंद्यांना रोखल्यामुळे नेरुळ येथील रहिवाश्यांमध्ये पोलीस दलाविषयी विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांच्या कडक भूमिकेचे नागरिकांनी स्वागत करून पोलीस दलाचे आभार मानले आहेत.

    रात्र गस्त वाढविल्याने गुन्हेगारी कृत्यांना आळा

    नेरुळ येथील गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी वपोनि नाईकवाडी यांनी पोलिसांची रात्र गस्त वाढविली आहे. वपोनि नाईकवाडी यांनी स्वतः नाईट राऊंड वेळी रस्त्यावर उतरून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत आहेत. पोलीस रात्र गस्त करत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    नेरुळ येथून अवैध धंदेवाल्यांचा काढता पाय

    वपोनि ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी सुरुवातीपासूनच अवैध धंदे हद्दपार करण्यासाठी व्यापक मोहीम राबविली आहे. पोलीस निरीक्षक यांच्या भूमिकेमुळे वैध धंदेवाल्यानी हद्दीतून काढता पाय घेतला आहे.

    नागरिकांनी तक्रारीसाठी पुढे यावे : पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांचे आवाहन

    नागरिकांना परिसरात कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य अथवा गुन्हेगारी प्रवृत्ती निदर्शनास आल्यास कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन वपोनि ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी केले आहे. नागरिकांनी पोलिसांचे कान व डोळे म्हणून कार्य केल्यास नक्कीच मोठा गुन्हा रोखता येतो. तक्रारीसाठी अधिकृत दूरध्वनी क्र. : 02227702323, 8655354108 व ई-मेल आयडी: ps.nerul.nm@mahapolice.gov.in वर संपर्क करा.

    हेही वाचा: Mumbai Robbery News : घाटकोपरमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सीसीटीव्ही फुटेजमुळे तीन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

    शेयर करें