मुख्य सामग्री पर जाएँ

Nalasopara Sex Racket Busted : "वेश्या व्यवसायाचा जाळं उघड! दोन महिला दलालांना अटक, तीन तरुणींची सुटका"

• नालासोपाऱ्यात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 'मंथन फॅमिली रेस्टॉरंट' ठरलं अनैतिक व्यवहाराचं केंद्र

व
विवेक

1 मिनट पठन

Navi Mumbai Busted Online Portal Sex Racket : नवी मुंबई पोलिसांची कारवाई ऑनलाइन साईट द्वारे चालवणाऱ्या वेश्या व्यवसायातून आठ पीडित महिलांची सुटका, नेरूळच्या शिरवणे गाव सेक्टर-01 मध्ये चालू होता व्यवसाय

•नालासोपाऱ्यात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 'मंथन फॅमिली रेस्टॉरंट' ठरलं अनैतिक व्यवहाराचं केंद्र

नालासोपारा :- नालासोपाऱ्यातील मंथन फॅमिली रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बार या ठिकाणी चालणाऱ्या अनैतिक वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश करत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने दोन महिला दलालांना अटक केली. या कारवाईत तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली असून, गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

17 मे रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. आरोपी महिला माधवी महादेव खाडे (68 वय) आणि सुवर्णा शंकर पोळ (40 वय) या मोबाईलवरून ग्राहकांशी संपर्क साधून पैशाच्या मोबदल्यात मुली पुरवत असल्याचे निष्पन्न झाले.

मंथन रेस्टॉरंटमध्ये सौदेबाजी सुरू असतानाच, पोलिसांनी छापा टाकून दोघींनाही रंगेहाथ ताब्यात घेतले. त्या पिडीत महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करत होत्या, हे तपासात स्पष्ट झाले.या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात 143(3) आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी या कारवाईत दाखवलेली तत्परता आणि सजगता प्रशंसनीय ठरत असून, आणखी कोणी या रॅकेटमागे आहे का, याचा तपास सुरू आहे.

अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे),मदन बल्लाळ सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार, सहाय्यक फौजदार उमेश गवई, महिला पोलीस हवालदार साक्षी डोईफोडे, पोलीस हवालदार रोशन किणी, पोलीस हवालदार महेंद्र शेट्ये, महिला पोलीस हवालदार सुप्रिया तिवले, पोलीस हवालदार सुनिल पागी, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्टरित्या केली आहे.

हेही वाचा: Raj Thackeray On Dr Jayant Narlikar Death : "‘विज्ञानाला साखरेचं कोटिंग देणारा माणूस गेला’ – राज ठाकरे यांची डॉ. जयंत नारळीकरांना फेसबुकवरून भावनिक श्रद्धांजली"

शेयर करें