मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : दुष्काळाचा नागपुरी संत्र्याला फटका उत्पादन घटल्याने आवक कमी राहणार; यंदा दरात तेजीची शक्यता

Pune News : पुणे : गोड चव आणि आकर्षक केशरी-पिवळ्या रंगासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूर संत्र्याची मार्केट यार्डातील फळ विभागात आवक सुरू झाली आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

दुष्काळाचा नागपुरी संत्र्याला फटका उत्पादन घटल्याने आवक कमी राहणार; यंदा दरात तेजीची शक्यता
दुष्काळाचा नागपुरी संत्र्याला फटका उत्पादन घटल्याने आवक कमी राहणार; यंदा दरात तेजीची शक्यता

Pune News : पुणे : गोड चव आणि आकर्षक केशरी-पिवळ्या रंगासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूर संत्र्याची मार्केट यार्डातील फळ विभागात आवक सुरू झाली आहे. मात्र, यंदा पावसातील मोठा खंड आणि पाण्याच्या तुटीचा फटका संत्रा उत्पादनाला बसला आहे. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत आवक कमी राहणार असून, यंदाच्या हंगामात संत्र्याचे दर तेजीत राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

सध्या आवक मर्यादित असली, तरी १० नोव्हेंबरनंतर हंगामाला वेग येण्याची शक्यता आहे. डिसेंबरअखेरपर्यंत संत्र्याचा हंगाम सुरू राहणार आहे.सध्या उच्च दर्जाच्या आठ ते दहा डझन संत्र्यांना घाऊक बाजारात १३०० ते १४०० रुपये भाव मिळत आहे. बाजारात दाखल होणाऱ्या संत्र्यांना सध्या रंग कमी असला, तरी चव गोड आहे. आठवडाभरात चांगल्या रंगाचा माल दाखल होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मागणीत वाढ होण्याचा अंदाज आहे. घरगुती ग्राहकांसह ज्यूस विक्रेते, फळ विक्रेते आणि पर्यटनस्थळांवरून संत्र्यांना मागणी आहे..https://maharashtramirror.com/ Pune News

दुष्काळामुळे उत्पादन घटले
“दुष्काळाचा फटका नागपूर संत्र्याला बसला आहे. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत आवक कमी राहणार असून, यंदा दरात तेजी राहण्याची शक्यता आहे,” अशी माहिती मार्केट यार्डातील संत्र्याचे आडतदार करण जाधव यांनी दिली.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें