Pune News : दोन आरोपींकडून १४ मोबाईल जप्त मुंढवा पोलिसांची कारवाई;
Pune News : पुणे : मुंढवा पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींकडून दोन लाख २७ हजार रुपये किमतीचे १४ मोबाईल संच जप्त करण्यात आले.
1 मिनट पठन

Pune News : चोरीतील दोन लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Pune News : पुणे : मुंढवा पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींकडून दोन लाख २७ हजार रुपये किमतीचे १४ मोबाईल संच जप्त करण्यात आले. प्रणित नरेंद्र जाधव (वय २०) आणि राहुल सुरेश सहाणी (वय २२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
प्रणित जाधव हा मुंढव्यातील सर्वोदय कॉलनी परिसरात, तर राहुल सहाणी हा खराडीतील चौधरी गोठ्याजवळील थिटे वस्ती येथे राहतो. मुंढवा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये दाखल गुन्ह्याच्या तपासात ही कारवाई करण्यात आली.
तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासात आरोपींकडून चोरीचे १४ मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्यांची एकूण किंमत दोन लाख २७ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अंमलदार विनोद साळुंके करीत आहेत.
अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त जीवन बेनीवाल आणि सहायक पोलिस आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मुंढवा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) सागर गोडे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने कारवाई केली.https://maharashtramirror.com/ Pune News
कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलिस उपनिरीक्षक युवराज पोमण, संभाजी नाईक तसेच पोलिस अंमलदार विनोद साळुंके, राहुल धोत्रे, योगेश गायकवाड, शिवाजी धांडे, चेतन गायकवाड, राहुल मोरे, सचिन बोराटे, रूपेश तोडकर, सलीम अत्तार, योगेश राऊत, स्वप्निल रासकर आणि अक्षय धुमाळ सहभागी झाले.
