Pune News : मुंढव्यात ३ किलो गांजासह तरुणाला अटक
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : मुंढवा परिसरात विक्रीसाठी गांजा जवळ बाळगणाऱ्या २७ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली.
1 मिनट पठन

Pune News : गांजा आणि मोबाईलसह एकूण १ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : मुंढवा परिसरात विक्रीसाठी गांजा जवळ बाळगणाऱ्या २७ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ३ किलो २५ ग्रॅम गांजा आणि मोबाईल असा एकूण १ लाख ६१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune News
सनी श्याम गुमाने (वय २७, रा. केशवनगर, गायरान वस्ती, मुंढवा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी अंमली पदार्थविरोधी पथक एकचे पथक पुणे शहरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार संदीप शिर्के यांना गांजा विक्रीबाबत गोपनीय माहिती मिळाली. https://maharashtramirror.com/ Pune News
त्यानुसार पथकाने सकाळी आकाराचे सुमारास मुंढवा येथील शरदनगर, गायरान वस्ती परिसरात छापा टाकला. राजेंद्र तोरसकर यांच्या गोठ्यासमोरील सार्वजनिक कच्च्या रस्त्यावर एक तरुण हातात पिशवी घेऊन संशयास्पदरीत्या उभा असल्याचे पोलिसांना दिसले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव सनी गुमाने असल्याचे सांगितले. पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडील निळ्या पिशवीत बिया, बोंडे व देठासह हिरवट रंगाचा ३ किलो २५ ग्रॅम गांजा आढळला. त्याची किंमत १ लाख ५१ हजार २५० रुपये असून, १० हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईलही जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस अंमलदार संदीप शिर्के यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थविरोधी पथक एकच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या पथकाने केली.
