मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : मुंढव्यात टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : मुंढव्याहून मांजरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर टेम्पो ट्रॅव्हलरने मोपेडला पाठीमागून धडक दिल्याने ३४ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची तक्रार मुंढवा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

मुंढव्यात टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
मुंढव्यात टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Pune News : चालकाविरुद्ध मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : मुंढव्याहून मांजरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर टेम्पो ट्रॅव्हलरने मोपेडला पाठीमागून धडक दिल्याने ३४ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची तक्रार मुंढवा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. हा अपघात ३० सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास झेड कॉर्नरजवळील हॉटेल शेरीसमोर घडला.https://maharashtramirror.com/ Pune News

अनुज बुलगानीन बैरागी (वय ३४, मूळ रा. उधमसिंहनगर, उत्तराखंड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांचे वडील बुलगानीन बैरागी (वय ६०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अद्याप अटक झालेली नाही.

फिर्यादीनुसार, चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव व निष्काळजीपणे टेम्पो ट्रॅव्हलर चालवला. त्याने अनुज यांच्या मोपेडला पाठीमागून जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने अनुज यांचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें