मुख्य सामग्री पर जाएँ

Mumbai Railway Mega Block : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक! प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी वेळापत्रक तपासा

•मध्य रेल्वेवर रविवारी मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

व
विवेक

1 मिनट पठन

Mega block of railways on Sunday, (July 7): Impact of mega block on Central and Harbor lines

•मध्य रेल्वेवर रविवारी मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

मुंबई :- मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी (26 ऑक्टोबर 2025) मेगाब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी (25 ऑक्टोबर 2025) रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल.

मध्य रेल्वे

माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 दरम्यान डाऊन जलद मार्ग: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या लोकल माटुंगा – मुलुंडदरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्थानकात पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील.

अप जलद मार्ग: ठाणे येथून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 दरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल मुलुंड – माटुंगादरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.

हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे

ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 दरम्यान
परिणाम,ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद असेल. ठाणे – वाशी/नेरुळ/पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द असतील.

पश्चिम रेल्वे

वसई रोड – भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री 1.15 ते पहाटे 4.45 दरम्यान विरार – भाईंदर/बोरिवली स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. या कालावधीत काही लोकल रद्द करण्यात येतील.

पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल. प्रवाशांनी त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा: Devendra Fadnavis : बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!

शेयर करें