Mumbai Police : अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या नराधमांना कोठडी! मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा निकाल; 'एमआयडीसी' पोलिसांच्या तपासाला यश
Mumbai Police Latest News : मुख्य आरोपी महिलेला 7 वर्षे, तर ग्राहकाला 10 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा | चकाला परिसरातील 'एसआरए' प्रकल्पात पोलिसांनी टाकला होता छापा | पोक्सो आणि पिटा कायद्यांतर्गत कारवाई
1 मिनट पठन

Mumbai Police Latest News : मुख्य आरोपी महिलेला 7 वर्षे, तर ग्राहकाला 10 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा | चकाला परिसरातील 'एसआरए' प्रकल्पात पोलिसांनी टाकला होता छापा | पोक्सो आणि पिटा कायद्यांतर्गत कारवाई
मुंबई :- अल्पवयीन मुलींचे शोषण करून त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. अंधेरी (पूर्व) येथील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2023 मध्ये उघडकीस आलेल्या एका गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने दोन आरोपींना दोषी ठरवत त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. Mumbai Police Latest News
नेमकी घटना काय?
मे 2023 मध्ये एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाली होती की, चकाला येथील कनकिया एसआरए प्रकल्पातील एका खोलीत रेणू मिश्रा नावाची महिला अल्पवयीन मुलींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी 30 मे 2026 रोजी सायंकाळी संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी रेणू मिश्रा ही स्वतःच्या फायद्यासाठी अल्पवयीन मुलीचा वापर करत असल्याचे आणि विनय फत्तेबहादूर पाठक हा तेथे ग्राहक म्हणून उपस्थित असल्याचे निष्पन्न झाले.
न्यायालयाने सुनावलेली शिक्षा
याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 370 (3), पिटा ॲक्ट आणि पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकाऱ्यांनी सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. दिंडोशी सत्र न्यायालयाने (कोर्ट क्र. 13) दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर 27 फेब्रुवारी 2026 रोजी खालीलप्रमाणे निकाल दिला,
1.विनय फत्तेबहादूर पाठक (ग्राहक): याला 10 वर्षे कारावास आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
2.रेणू गणेश मिश्रा (मुख्य आरोपी महिला): हिला 7 वर्षे कारावास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
तपास पथकाचे कौतुक
मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण आणि अपर पोलीस आयुक्त परमजित सिंह दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी फत्ते झाली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र वाणी, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे आणि त्यांच्या पथकाने केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामुळे आरोपींना शिक्षा मिळवून देण्यात यश आले आहे.
