Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; कोकण प्रवाशांसाठी मात्र 'होळी स्पेशल' मेमू धावणार
Mumbai Local Train Latest News : लोकल फेऱ्या रद्द आणि काही गाड्या विलंबाने | सीएसएमटी, कुर्ला ते वाशी दरम्यान प्रवाशांचे हाल | होळीनिमित्त रत्नागिरी आणि चिपळूणसाठी जादा अनारक्षित फेऱ्या
2 मिनट पठन

Mumbai Local Train Latest News : लोकल फेऱ्या रद्द आणि काही गाड्या विलंबाने | सीएसएमटी, कुर्ला ते वाशी दरम्यान प्रवाशांचे हाल | होळीनिमित्त रत्नागिरी आणि चिपळूणसाठी जादा अनारक्षित फेऱ्या
मुंबई :- मुंबईतील रेल्वे रुळांची Mumbai Local Train देखभाल आणि तांत्रिक दुरुस्तीसाठी रविवारी रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनसह हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरही काही तास लोकल सेवा विस्कळीत राहणार आहे. Mumbai Sunday MegaBlock Latest News
1.मध्य रेल्वे: सीएसएमटी ते विद्याविहार (सकाळी 10.55 ते दुपारी 3.55)*
मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. या काळात धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही फेऱ्या रद्द राहतील, तर काही गाड्या विलंबाने धावतील.
2.हार्बर रेल्वे: कुर्ला ते वाशी (सकाळी 11.10 ते दुपारी 4.10)
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. या काळात सीएसएमटी ते वाशी-बेलापूर-पनवेल दरम्यानची थेट सेवा बंद राहील. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील, मात्र प्रवाशांना कुर्ला ते वाशी हा प्रवास पर्यायी मार्गाने करावा लागेल.
3 पश्चिम रेल्वे: चर्चगेट ते मुंबई सेंट्रल (सकाळी 10.35 ते दुपारी 3.35)
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक आहे. या काळातील सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर वळवल्या जातील. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, उर्वरित गाड्या 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
कोकण प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: 6 विशेष अनारक्षित फेऱ्या
होळीच्या सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पनवेल-रत्नागिरी आणि दिवा-चिपळूण दरम्यान 6 जादा मेमू फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
पनवेल-रत्नागिरी-पनवेल (मेमू)
पनवेल ते रत्नागिरी (01157): दुपारी 4.40 ला सुटून रात्री 11.55ला पोहोचेल (28 फेब्रु, 1 मार्च).
रत्नागिरी ते पनवेल (01158): सकाळी 9.00 ला सुटून दुपारी 4.10 ला पोहोचेल.
दिवा-चिपळूण-दिवा (मेमू):
दिवा ते चिपळूण (01159/60): ही विशेष गाडी 1 मार्चऐवजी आता 2 मार्च रोजी धावणार आहे.
होळीच्या गर्दीमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी या अनारक्षित (Unreserved) गाड्या अत्यंत सोयीच्या ठरणार आहेत. प्रवाशांनी ब्लॉकची वेळ लक्षात घेऊनच आपला प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.
