मुख्य सामग्री पर जाएँ

Mumbai news: घाटकोपरमध्ये चाळीवर दरड कोसळून ६ जणांचा मृत्यू

https://maharashtramirror.com/

म
मुबारक

1 मिनट पठन

Mumbai news: घाटकोपरमध्ये चाळीवर दरड कोसळून ६ जणांचा मृत्यू

https://maharashtramirror.com/

Ghatkopar landslide ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती

 ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती

Mumbai landslide : रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपर-साकीनाका परिसरातील चिरागनगर येथे डोंगराचा भाग खचून दगडांचा मोठा ढिगारा गौसिया चाळीतील दोन ते तीन घरांवर कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. आणखी काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असल्याने बचाव यंत्रणांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, रात्रभर परिसरात पावसाचा जोर कायम होता. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक डोंगराचा काही भाग खचला. त्यानंतर माती आणि मोठे दगड खाली असलेल्या घरांवर कोसळले. घरातील नागरिक झोपेत असतानाच दुर्घटना घडल्याने त्यांना बाहेर पडण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. mumbai landslide


घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलीस, मुंबई अग्निशमन दल, मुंबई महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार, कॅमेऱ्यांच्या सहाय्यानेही ढिगाऱ्याखाली शोध घेतला जात आहे. maharashtra mumbai landslide

बचाव पथकांनी आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढले

पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे तीनच्या सुमारास पावसामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. बचाव पथकांनी आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढले असून, आणखी काही नागरिक अडकले असण्याची शक्यता लक्षात घेऊन शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे. maharashtra mumbai landslide

अरुंद गल्ल्यांमुळे बचावकार्यात अडथळे
महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली. परिसरातील गल्ल्या अत्यंत अरुंद असल्याने मोठी यंत्रसामग्री घटनास्थळापर्यंत नेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी माती आणि दगड हाताने हटवावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. अग्निशमन दल, महापालिका आणि इतर यंत्रणा समन्वयाने बचावकार्य करत आहेत. maharashtra mumbai landslideumbai landslide


दरम्यान, घटनास्थळी नागरिकांची गर्दी होऊ नये आणि बचावकार्यात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी परिसरात पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आजूबाजूच्या घरांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध सुरू असल्याने मृत आणि जखमींच्या संख्येबाबत पुढील अधिकृत माहितीकडे लक्ष लागले आहे. maharashtra mumbai landslide

Pune accident: पुण्यात होतोय केवळ खड्ड्यांचा विकास

@maharashtramirror1136

https://www.youtube.com/shorts/v_I4AGz5uFg

Pune crime news: बोपदेव घाटातील फॉरेस्ट रेस्टोरंन्टवर अवैध हुक्का पार्लर चालवल्याबद्दल छापा ,अनेक अल्पवयीन घेतले ताब्यात

शेयर करें