मुख्य सामग्री पर जाएँ

Mumbai Fake Police News : तोताया पोलिसांनी तरुणाची लाखोंची फसवणूक

•19 वर्षीय तरुणाची पावणेतीन लाखाची फसवणूक, मोबाईल लिंक ओपन केल्याने घातला गंडा

व
विवेक

1 मिनट पठन

Dombivli boy kidnapping, minor assault, knife attack, Dombivli crime, Shivaji Nagar youth, Bhopar incident, abduction case, juvenile victim, Manpada police, Maharashtra crime, डोंबिवली अपहरण, अल्पवयीन मुलावर हल्ला, चाकूहल्ला, भोपर गाव घटना, मानपाडा पोलीस, पूर्व वैमनस्य, डोंबिवली गुन्हा, अल्पवयीन मुलगा जखमी, डोंबिवली चाकू प्रकरण, सुनीलनगर वाद

•19 वर्षीय तरुणाची पावणेतीन लाखाची फसवणूक, मोबाईल लिंक ओपन केल्याने घातला गंडा

मुंबई :- तरुणाने लिंक उघडल्यानंतर पोलीस असल्याची बतावणी करून एका भामट्याने त्याच्याकडून पावणेतीन लाख रुपये उकळले. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

मोबाइलवर आलेली एक लिंक उघडणे भांडुप परिसरातील एका तरुणाला मोठी महागात पडली.19 वर्षांचा असून तो महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. महिन्याभरापूर्वी त्याच्या मोबाइलवर एक अश्लील व्हिडीओ असलेली लिंक आली होती. ही लिंक उघल्यानंतर एका तरुणीने त्याला काही अश्लील मेसेज करून त्याच्याकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. तरुणाने तत्काळ तिला पैसे पाठवले. त्यानंतर काही वेळातच त्याला एका व्यक्तीने फोन केला. आपण उत्तर प्रदेश पोलीस दलातील अधिकारी असल्याचे त्याने सांगितले. तुझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून तो मिटवण्यासाठी त्याने त्याच्याकडे काही पैशांची मागणी केली.

गुन्हा दाखल झाल्याचे ऐकून तरुण अधिकच घाबरला. आपली कुटुंबात बदनामी होईल या भीतीने तो भयभीत झाला. त्यामुळे आरोपीने सांगितल्याप्रमाणे त्याने त्याच्या खात्यात एकूण 2 लाख 74 हजार रुपये पाठवले. मात्र त्यानंतरही आरोपी पैशांची मागणी करीत होता. त्यामुळे तरुणाने ही बाब त्याच्या आईला सांगितली. आईने याबाबत सायबर पोलीसात तक्रार दाखल केली. त्यानंतर भांडुप पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

हेही वाचा: Mumbai News : बदलापूर लैंगिक छळ प्रकरणात नवीन एसआयटी स्थापन

शेयर करें