Mumbai Cyber News : सायबर पोलिसांची यशस्वी कारवाई : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणुकीतील 2.71 लाखांची रक्कम तक्रारदाराच्या खात्यात परत!
Mumbai Latest Cyber Crime News : ‘शेअर ट्रेडिंग’च्या नावाखाली लुबाडलेले तब्बल 2.71 लाख परत मिळवले!!
1 मिनट पठन

Mumbai Latest Cyber Crime News : ‘शेअर ट्रेडिंग’च्या नावाखाली लुबाडलेले तब्बल 2.71 लाख परत मिळवले!!
मिरा-भाईंदर :- 'ऑनलाईन शेअर ट्रेडिंग'मध्ये मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेची तब्बल 2 लाख 71 हजार 336 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. पण सायबर पोलिसांनी Mumbai केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे, तर न्यायालयीन प्रक्रिया आणि बँकेशी समन्वय करत संपूर्ण रक्कम परत मिळवून देत एक मोठी कारवाई करत यश मिळवले आहे.
सोशल मीडियावर गंडा, पण पोलिसांनी वाचवला पैसा!
भाईंदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या श्रीमती जैन यांना सोशल मीडियावरून "शेअर ट्रेडिंग"च्या आकर्षक जाहिराती दिसल्या. नफ्याच्या आमिषाला भुलून त्यांनी एका अनोळखी ॲपवर तब्बल 2.71 लाखांची गुंतवणूक केली. पण गुंतवणुकीनंतर नफा तर दूरच, मूळ रक्कमही परत मिळाली नाही. अखेर फसवणूक लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाणे, मिरा रोड येथे धाव घेतली.
तांत्रिक चौकशी, बँक खात्यांवर कारवाई आणि न्यायालयात ठोस कामगिरी
सायबर पोलिसांनी तक्रारीची तात्काळ नोंद घेत NCCRP पोर्टलवर गुन्हा नोंदवला. संशयितांच्या बँक खात्यांमधील रक्कम गोठवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराला न्यायालयीन प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करत तांत्रिक व कायदेशीर पुरावे सादर केले. न्यायालयाच्या आदेशानंतर, अखेर संपूर्ण 2 लाख 71 हजार 336 रुपये तक्रारदाराच्या खात्यात जमा करण्यात आले.

हि कारवाई अविनाश अंबूरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पुणे, पोलीस अंमलदार कुणाल सावळे, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, प्रविण सावंत सायबर पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे.
