मुख्य सामग्री पर जाएँ

Mumbai Crime News : 17 वर्षांपासून फरार असलेला हत्येतील मुख्य आरोपी टिटवाळ्यातून जेरबंद; मुलुंड पोलिसांची धडक कारवाई

•2009 मधील हत्येच्या गुन्ह्यात नाव, मोबाईल आणि सिम कार्ड बदलून लपून राहत असलेल्या फिरोज शेखला बेड्या; कंस्ट्रक्शन साईटवर फिटरचे काम करत होता आरोपी

व
विवेक

1 मिनट पठन

Mumbai Crime News : 17 वर्षांपासून फरार असलेला हत्येतील मुख्य आरोपी टिटवाळ्यातून जेरबंद; मुलुंड पोलिसांची धडक कारवाई

•2009 मधील हत्येच्या गुन्ह्यात नाव, मोबाईल आणि सिम कार्ड बदलून लपून राहत असलेल्या फिरोज शेखला बेड्या; कंस्ट्रक्शन साईटवर फिटरचे काम करत होता आरोपी

मुंबई :- जमिनीच्या जुन्या वादातून मयत इराम जामे मन्सूर याच्या डोक्यात हातोडा घालून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात 20 जुन 2009 साली भादंवि कलम 302, 34 अन्वये दाखल करण्यात आला होता. त्यादरम्यान गुन्ह्यातील मुख्य आरोपी फिरोज मो. सुलेमान शेख (वय 39) हा गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व लपवून विविध ठिकाणी फरार होता. पोलिसांनी त्याच्या मूळ गावी आणि वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेऊनही तो मिळून येत नसल्याने 2009 साली त्याला फरार घोषित करण्यात आले होते.

टिटवाळ्यात कंस्ट्रक्शन साईटवर काम करताना लागला सुगावा

मुलुंड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला गुप्त बातमीदारांमार्फत आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी फिरोज शेख हा आपले नाव, मोबाईल, सिम कार्ड बदलून टिटवाळा (पूर्व) येथील बनेली गाव परिसरात कुटुंबासह लपून राहत असल्याची माहिती मिळाली. तो तेथील एका कंस्ट्रक्शन साईटवर फिटरचे काम करत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला बनेली चौक, टिटवाळा येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले मूळ नाव फिरोज मो. सुलेमान शेख (रा. कटिहार, बिहार) असल्याचे मान्य केले.

जुन्या भांडणाच्या रागातून केली होती हत्या

पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता, आरोपी फिरोज आणि त्याच्या साथीदारांनी जुन्या भांडणाच्या रागातून मयत मन्सूरच्या डोक्यात हातोडा मारून त्याची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. ही कारवाई बृहन्मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह-आयुक्त मनोज कुमार, अपर पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलुंड पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

हेही वाचा: Maharashtra District bank Election Result 2026 : महाराष्ट्र जिल्हा बँक निवडणुकांचे निकाल जाहीर; सांगली, सातारा आणि अहिल्यानगरमधील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी समोर

शेयर करें