Mumbai news : मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; 71 हजारांच्या 'कोडेन्कफ सिरप'सह एकाला अटक
Mumbai news :मुंबई :- अमली पदार्थ खरेदी-विक्री करणाऱ्या आणि साठा करणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना, मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (वरळी युनिट) हाती मोठे यश आले आहे.
1 मिनट पठन

Mumbai news : चेंबूरमधील आर. सी. मार्ग मोनोरेल स्टेशनजवळ वरळी युनिटची कारवाई; 71 बाटल्या जप्त करत गुन्हा दाखल
Mumbai news :मुंबई :- अमली पदार्थ खरेदी-विक्री करणाऱ्या आणि साठा करणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना, मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (वरळी युनिट) हाती मोठे यश आले आहे. चेंबूर परिसरातील आर. सी. मार्ग जंक्शन मोनोरेल स्टेशनजवळ एका संशयित इसमाच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्याच्याकडून लाखो रुपयांचा अवैध अमली पदार्थ मानला जाणारा 'कोडेन्कफ सिरप' जप्त करण्यात आला असून या प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news
71 हजार रुपयांच्या बाटल्या आणि संशयिताची धरपकड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटेच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. आर. सी. मार्ग, चेंबूर येथील मोनोरेल स्टेशनखाली सापळा रचून एका इसमाला अटक करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या झडतीत एकूण 71 हजार रुपये मूल्याच्या 'कोडेन्कफ सिरप' या अमली पदार्थाच्या 100 मिली. वस्तुमानाच्या एकूण 71 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. हा साठा तो कोठे विकण्याच्या तयारीत होता, याचा कसून तपास सुरू आहे.
उच्च अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई
ही यशस्वी कारवाई बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच अमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रीजी आणि सहायक पोलीस आयुक्त सुधीर हिर्डेकर यांच्या हाताखाली वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण वाघ व पथकातील अंमलदारांनी ही कामगिरी फत्ते केली आहे.
