Mulund Crime News : मुलुंडमध्ये आंतरराज्य टोळीचा दरोड्याचा डाव उधळला; उत्तर प्रदेश, दिल्ली अन् बिहारमधील 9 जणांना अटक
Mumbai Mulund Police Latest News : MTNL ची केबल लुटण्यासाठी आले होते आयशर आणि हायड्रासह; 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी रचला सापळा
2 मिनट पठन

Mumbai Mulund Police Latest News : MTNL ची केबल लुटण्यासाठी आले होते आयशर आणि हायड्रासह; 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी रचला सापळा
मुंबई (मुलुंड) :- मुलुंड पोलिसांनी एका धाडसी कारवाईत आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळल्या असून, शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 9 अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. उत्तर प्रदेशातून केबल लुटण्यासाठी आलेल्या या टोळीचा डाव मुलुंड पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे उधळून लावला. या कारवाईत हायड्रा क्रेन, आयशर वाहन आणि शस्त्रास्त्रांसह सुमारे 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मध्यरात्री 'एल.बी.एस. रोड'वर थरार
16 मार्च 2026 रोजी रात्री उशिरा मुलुंड पोलीस ठाण्याचे सपोनि विजय पवार यांना एका गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. उत्तर प्रदेशातील केबल लुटणारी एक मोठी टोळी 10 ते 12 साथीदारांसह आयशर वाहनातून मुलुंडच्या एल.बी.एस. रोडवर येत असल्याची ती बातमी होती. ही टोळी कटर मशीन आणि हायड्रा क्रेनच्या साहाय्याने 'एम.टी.एन.एल.'ची (MTNL) महागडी केबल चोरण्याच्या तयारीत होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन विशेष पथके तयार करण्यात आली. 17 मार्चच्या पहाटे पोलिसांनी सापळा रचून या आंतरराज्य टोळीला रंगेहाथ ताब्यात घेतले.
टोळीतील 9 आरोपी अटकेत
पकडण्यात आलेले आरोपी विविध राज्यांतील असून त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
1) नेहाल सय्यद (48, उ.प्र.)
2) मोहम्मद इसरूल (20, उ.प्र.)
3) हक्राम मोहम्मद (21, उ.प्र.)
4) अभिषेक महातो (22, दिल्ली)
5) आहद आलम (40, बिहार)
6) मोहम्मद राजा अन्सारी (30, दिल्ली)
7) मोहम्मद मुर्शिद अन्सारी (29, बिहार)
8) संजय महातो (38, दिल्ली)
9) संजयकुमार शाह (42, बिहार)
12 लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरले जाणारे मोठे साहित्य जप्त केले आहे:
वाहने: एक आयशर ट्रक आणि एक हायड्रा क्रेन.
शस्त्रे: 2 लोखंडी तलवारी आणि 1 चाकू.
साहित्य: 10 एक्सा ब्लेड, कटर मशीन, हातोडे, पटाशी, पहार, लोखंडी वायररोप, 10 ट्रॅफिक सेफ्टी कोन आणि रिफ्लेक्ट जॅकेट.
चोरलेला माल: 6 फूट 9 इंच लांबीची एम.टी.एन.एल.ची वायर.
या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 12.22 लाख रुपये इतकी आहे.
20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 20 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने यापूर्वी मुंबईत किंवा इतर राज्यांत अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
ही यशस्वी कामगिरी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह-आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, उपायुक्त हेमराजसिंह राजपूत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
