Mumbai News : MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या मागणीला यश
Mumbai News : मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली करण्यात आली आहे.
1 मिनट पठन

Mumbai News : मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे. एमपीएससी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी सचिवांच्या बदलीची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला सचिवांच्या बदलीचे आश्वासन दिल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Mumbai news
एमपीएससीच्या कारभारासंदर्भातील विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये एमपीएससी सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. https://maharashtramirror.com/ Mumbai News
एमपीएससी अध्यक्षांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली होती. या मागणीवर अध्यक्षांच्या कामकाजाची न्यायालयीन चौकशी तीन महिन्यांत करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे. मात्र, अध्यक्ष हे संवैधानिक पद असल्याने त्यांच्या राजीनाम्याबाबत वेगळी भूमिका घेण्यात आली.
दरम्यान, सचिवांच्या बदलीसह एमपीएससीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेणे, आगामी भरतीचे नियोजन जाहीर करणे आणि परीक्षार्थींच्या इतर मागण्यांवरही बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर २ ऑक्टोबर रोजी पुण्यात नियोजित असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी जाहीर केले होते.
