Pune News : एमपीएससी आंदोलनाचा हायड्रॉमा पेटला; आमदार रोहित पवारांचे ट्विटर खाते सस्पेंड, पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात!'
Pune News :पुणे :- पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून रस्त्यावर उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि राज्य सरकारमधील संघर्ष आता कमालीचा ताणला गेला आहे.
2 मिनट पठन

Pune News : आंदोलन चिरडण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्याला कोर्टात पाठवले; 'सीडीआर' काढण्याचे रोहित पवारांचे आव्हान'
Pune News :पुणे :- पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून रस्त्यावर उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि राज्य सरकारमधील संघर्ष आता कमालीचा ताणला गेला आहे. एकीकडे रोहित पवार यांचे अधिकृत ट्विटर (X) खाते अचानक सस्पेंड करण्यात आल्याने विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे, तर दुसरीकडे रोहित पवारांच्या या आंदोलनाविरोधात पुणेकरांनी थेट उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे.या कायदेशीर घडामोडींनंतर पोलिसांनी आंदोलनस्थळी प्रचंड बंदोबस्त वाढवला असून, सरकार आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
'पुणेकरांना त्रास होऊ नये म्हणून पर्यायी जागा निवडली; याचिकाकर्ता भाजपचाच कार्यकर्ता'
आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार रोहित पवार यांनी आंदोलनाच्या जागेवरून होणाऱ्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले, "आम्हाला गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यायचा होता. विद्यार्थी मोठ्या संख्येने जमणार हे माहित असल्याने आम्ही अलका चौक किंवा इतर वर्दळीचे रस्ते टाळले, जेणेकरून पुणेकरांना त्रास होणार नाही. म्हणूनच आम्ही एस. एम. जोशी मार्गावर टिळक भवनाजवळ बसलो. जिथे दोन्ही बाजूंना पर्यायी रस्ते आहेत आणि वर्दळ कमी आहे."https://maharashtramirror.com/ Pune News
याचिकाकर्त्यावर थेट निशाणा साधत रोहित पवार म्हणाले, "आंदोलनाविरोधात हायकोर्टात गेलेला याचिकाकर्ता हा पालिकेतील एका भाजपच्या बड्या नेत्याचा खास कार्यकर्ता आहे. जो त्या नेत्याचे अर्थकारण सांभाळतो, पालिकेची कामे घेतो आणि बिल्डर आहे. तो भाजपचाच कार्यकर्ता असल्याचे सिद्ध झाले आहे."
'पोलिस अधिकारी आणि याचिकाकर्त्याची भेट; 'सीडीआर' काढण्याची रोहित पवारांची मागणी'
आंदोलनस्थळी अचानक वाढलेल्या पोलीस बंदोबस्तावर शंका उपस्थित करत रोहित पवार यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले:
पोलिस-याचिकाकर्ता भेट: काल रात्री पोलीस प्रशासनातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने त्या भाजपच्या याचिकाकर्त्याची भेट घेतल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. सरकारने या पोलीस अधिकाऱ्याचे Call Detail Record (CDR) जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले.
कोर्टाच्या निर्णयाचा सुगावा: "सहा दिवसांत जेवढा पोलीस फाटा नव्हता, तेवढे पोलीस आज अचानक इथे जमले आहेत. हायकोर्ट काय निर्णय देणार आहे, हे पोलिसांना आधीच कळले आहे आणि विद्यार्थ्यांना इथून उचलण्यासाठीच हे पोलीस बळ वापरले जात आहे," असा आरोप त्यांनी केला.
'विद्यार्थ्यांची तब्येत खालावली; रोहित पवार रात्रभर रस्त्यावरच झोपले'
गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती आता चिंताजनक बनली असून काहींची तब्येत खालावली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आमदार रोहित पवार स्वतः रात्रभर आंदोलनस्थळी रस्त्यावरच झोपले होते.ट्विटर खाते सस्पेंड झाल्यानंतरही फेसबुकच्या माध्यमातून लढा सुरू ठेवणार असल्याचे सांगत, "विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही," असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. दरम्यान, पोलीस बंदोबस्त वाढल्याने पुण्यात MPSC आंदोलनाच्या ठिकाणी तणावपूर्ण शांतता पसरली आहे.
