मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : एमपीएससी आंदोलनामुळे नवी पेठेत वाहतुकीत बदल ; पत्रकार भवन परिसरात विद्यार्थ्यांची गर्दी; एस. एम. जोशी पुलाकडे जाणारी वाहने म्हात्रे पुलाकडे वळविण्याचे आवाहन

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी नवी पेठेतील पत्रकार भवन परिसरात आंदोलन सुरू केल्याने या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

एमपीएससी आंदोलनामुळे नवी पेठेत वाहतुकीत बदल पत्रकार भवन परिसरात विद्यार्थ्यांची गर्दी; एस. एम. जोशी पुलाकडे जाणारी वाहने म्हात्रे पुलाकडे वळविण्याचे आवाहन
एमपीएससी आंदोलनामुळे नवी पेठेत वाहतुकीत बदल पत्रकार भवन परिसरात विद्यार्थ्यांची गर्दी; एस. एम. जोशी पुलाकडे जाणारी वाहने म्हात्रे पुलाकडे वळविण्याचे आवाहन

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी नवी पेठेतील पत्रकार भवन परिसरात आंदोलन सुरू केल्याने या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. लालबहाद्दुर शास्त्री रस्त्यावर संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

आंदोलनासाठी पत्रकार भवन परिसरात विद्यार्थ्यांची गर्दी होत असल्याने गांजवे चौकातून पत्रकार भवनमार्गे एस. एम. जोशी पुलाकडे जाणारा मार्ग वाहनचालकांनी टाळावा. या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्ग निश्चित केला आहे. https://maharashtramirror.com/ Pune News

कर्वे रस्ता, भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना आणि कोथरूडकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लालबहाद्दुर शास्त्री रस्त्यावरील सेनादत्त पोलीस चौकी चौकातून म्हात्रे पुलाच्या दिशेने जावे. तसेच पूना हॉस्पिटलकडे जाणाऱ्या वाहनचालकांनीही शक्यतो पत्रकार भवन आणि एस. एम. जोशी पूल मार्गाचा वापर टाळावा, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

आंदोलनामुळे निर्माण होणारी गर्दी तसेच परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून पत्रकार भवन परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी आवाहन केले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें