मुख्य सामग्री पर जाएँ

Sambhajinager News : एम.पी.एस.सी पेपरफुटीविरोधात छ.संभाजीनगरात विद्यार्थ्यांचा 'बेरोजगार गणपतीवाले' स्टॉल

Sambhajinager News : छत्रपती संभाजीनगर : सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या काही तरुणांनी आता हातात स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांबरोबर गणेशमूर्ती घेतल्या आहेत.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

एम.पी.एस.सी पेपरफुटीविरोधात छ.संभाजीनगरात विद्यार्थ्यांचा 'बेरोजगार गणपतीवाले' स्टॉल
एम.पी.एस.सी पेपरफुटीविरोधात छ.संभाजीनगरात विद्यार्थ्यांचा 'बेरोजगार गणपतीवाले' स्टॉल

Sambhajinager News : छत्रपती संभाजीनगर : सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या काही तरुणांनी आता हातात स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांबरोबर गणेशमूर्ती घेतल्या आहेत. 'बेरोजगार गणपतीवाले' अशी ओळख या तरुणांनी गणेशमूर्ती विक्रीचा स्टॉल सुरू करत, त्यातून स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थेवर आणि पेपरफुटीच्या प्रकारांवर प्रहार केला आहे.https://maharashtramirror.com/ Sambhajinager News
ऋषिकेश ठोंबरे, ज्ञानेश्वर पाटेकर (दोघे रा. संभाजीनगर), आकाश कोपनर (रा. बीड) अशी या तरुणांची नावे आहेत. स्पर्धा परीक्षांची ते तयारी करत असून, हे तिघे 'रूम पार्टनर' आहेत. त्यांनी जिल्हा परिषद मैदानावर गणेशमूर्तीचा स्टॉल लावला आहे. या स्टॉलला 'बेरोजगार गणपतीवाले' असे नाव दिले. 'एमपीएससी, बँकिंग, पेपर लीक' असा उल्लेख असलेला हा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.https://maharashtramirror.com/ sambhajinager news
नोकरी मिळविण्यासाठी अभ्यास, परीक्षा व त्यानंतरच्या प्रक्रियेत वर्षे खर्ची घालणाऱ्या या तरुणांनी पेपरफुटीच्या घटनांवर चिंता व्यक्त केली. मेहनत करूनही संधी निसटत असल्याची भावना तरुणांत आहे. परिस्थिती हलाखीची, शेतीही संकटात असल्याने रूम, मेसचा खर्चासाठी गणेशमूर्ती विक्री करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत आहेत.

शेयर करें