मुख्य सामग्री पर जाएँ

महाळुंगेतील मटका किंग रफीक काझीवर ‘एमपीडीए’

एका वर्षासाठी अमरावती कारागृहात रवानगी

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

महाळुंगेतील मटका किंग रफीक काझीवर ‘एमपीडीए’

एका वर्षासाठी अमरावती कारागृहात रवानगी

पुणे: दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या मटका आणि जुगाराचे अड्डे चालविणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कडक कारवाई केली आहे. रफीक शगीर काझी याला ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यान्वये एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्याला अमरावती मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले आहे.

काझीवर १८ गंभीर गुन्हे दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, रफीक शगीर काझी (वय ३९, रा. काजीवाडा, चाकण, ता. खेड) हा गेल्या अनेक दिवसांपासून ‘कल्याण’ नावाचा मटका आणि जुगाराचे अवैध अड्डे चालवत होता. त्याच्याविरुद्ध आत्तापर्यंत १८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने, त्याच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी तयार केला होता.
पोलीस उपायुक्त (परिमंडळ ४) श्वेता खेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त (महाळुंगे विभाग) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव पोलीस आयुक्तालयाकडे पाठवण्यात आला होता.

आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कागदपत्रांची पडताळणी करून रफीक काझी याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले. मात्र, आदेश निघाल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. मंगळवारी (ता. २१) त्याला कायदेशीर प्रक्रियेनंतर अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सहायक पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, चिंचकर, संतोष जगताप, नंदू तरटे आणि गणेश मापारी यांच्या पथकाने केली आहे.

‘MPDA’ on Matka King Rafiq Kazi from Mahalunga

शेयर करें