Moshi Building Collapse : त्या इमारतीचे दोन मजले अनधिकृत ?
पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र मिरर
2 मिनट पठन

Moshi Building Collapse : कागदपत्रांमधून गंभीर बाबी समोरमहापालिका अधिकाऱ्यांची लपवाछपवी
पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र मिरर
Moshi Building Collapse : मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या केवळ तळमजला बांधण्याची परवानगी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या इमारतीचे वरील दोन मजले अनधिकृत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, महापालिका अधिकारी या बाबत स्पष्ट माहिती देण्यास नकार देत आहेत. इमारत अनधिकृत होती का ? परवानगी कोणी दिली, अनधिकृत होती तर कारवाई का नाही केली, या प्रश्नांची उत्तरे देण्यास अधिकारी टाळाटाळ करत आहे. Moshi Building Collapse illegal Two floors building

मोशी येथे कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा डोंगर वाहत येऊन कोसळलेली इमारत अनधिकृत होती का ? या ठिकाणी प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी फक्त तळमजल्याला परवानगी देण्यात आली होती. मग, त्यावर दोन मजले बांधत अनधिकृत बांधकाम केले आहे का ? असा गंभीर मुद्दा बांधकाम परवानगी विभागातून मिळालेल्या कागदपत्रांमधून मिळालेल्या माहितीनुसार उपस्थित झाला आहे. यामध्ये अभियंत्यांपासून ते अतिरिक्त आयुक्तांपर्यंत सर्वच सामील होते का ? त्यांनीच हे अनधिकृत बांधकाम करण्यास बळ दिले का ? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. ( Moshi Building Collapse)
Moshi Building Collapse : मोशी कचरा डेपोच्या भ्रष्टाचाराचा आका कोण ?

मोशी कचरा डेपोमध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठी इमारत व काही बांधकाम उभे करण्यात आले आहे. प्रकल्पासाठी १७ जून २०१४ मध्येच परवानगी मिळाली होती. तर प्रकल्पाच्या प्रशासकीय कामकाजासाठी कार्यालय बांधण्यासाठी ११ नोव्हेंबर २०१९ व २६ जुलै २०२३ मध्ये सुधारित परवानगी दिली. त्यासाठी पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाकडे तळमजला बांधण्यासाठी परवानगी मागितली. त्यामधील नकाशावर प्रशासकीय इमारतीसाठी जी प्लस ० म्हणजेच फक्त तळमजल्याला परवानगी मागितली असल्याचे स्पष्ट होत आहे. ज्याचा परिसर ५००.५९ चौरस मीटर इतका होता. त्यानुसार बांधकाम परवानगी विभागाने नोव्हेंबर २०१९ मध्ये बांधकाम करण्यासाठी परवानगी दिली. त्याचे वास्तुविशारद अनिरुद्ध दिक्षीत हे आहेत. ( Moshi Building Collapse)
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
कागदपत्र व परवानगीनुसार याठिकाणी उभारण्यात आलेली प्रशासकीय इमारत ही फक्त ५००.५९ चौरस मीटरची तळमजला स्वरुपात होती. कागदावर अशी इमारत असताना प्रत्यक्षात जागेवर मात्र, तळमजला अधिक दोन मजले बांधण्यात आले होते. ते अनधिकृत बांधकाम चक्क पर्यावरण विभागानेच केले असल्याचे प्रथमदर्शनी या कागदपत्रांमधून स्पष्ट होत आहे. ( Moshi Building Collapse )
Amol kolhe : ४८ तासांनंतरही खासदार कोल्हे घटनास्थळापासून दूरच
एका दिवसात पूर्णत्वाचा दाखला…
विशेष म्हणजे या प्रशासकीय इमारतीला महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने २६ जुलै २०२३ ला सुधारित मंजुरी दिली आहे. तर अवघ्या २४ तासांत म्हणजेच दुसऱ्या दिवशी २७ जुलै २०२३ ला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला आहे. हा दाखला देखील तळमजला पूर्ण एवढाच आहे.
फाईलनुसार याठिकाणी बांधलेल्या प्रशासकीय इमारतीला तळमजला बांधण्यास परवानगी होती. तसेच ५००.५९ चौरस मीटर तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला दिला होता.
