मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Crime : भोंदू महिला 'गुरुआई' मोनाली विधातेसह साथीदारांवर बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

Pune Crime : पुणे: सोशल मीडियावरील रील्सच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन करून, शारीरिक व्याधी बऱ्या करणे आणि कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवत नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या 'गुरुआई' उर्फ मोनाली विधाते आणि तिच्या ५ साथीदारांविरुद्ध पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

भोंदू महिला 'गुरुआई' मोनाली विधातेसह साथीदारांवर बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
भोंदू महिला 'गुरुआई' मोनाली विधातेसह साथीदारांवर बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

Pune Crime : 'उतारे व विधी'च्या नावाखाली फसवणूक

Pune Crime : पुणे: सोशल मीडियावरील रील्सच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन करून, शारीरिक व्याधी बऱ्या करणे आणि कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवत नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या 'गुरुआई' उर्फ मोनाली विधाते आणि तिच्या ५ साथीदारांविरुद्ध पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक, जादूटोणाविरोधी कायदा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime

सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी येथील एका नागरिकाने या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीने सोशल मीडियावर मोनाली विधातेचे रील्स व व्हिडिओ पाहिले होते. घरातील आजारपण आणि शारीरिक समस्या दूर होतील या आशेने त्यांनी विधातेशी संपर्क साधला. विधातेने त्यांना विशेष पूजा, 'उतारे' आणि 'विधी' करण्याचे आश्वासन दिले. या बहाण्याने तिने वेळोवेळी तक्रारदाराकडून सुमारे ४५ ते ४७ हजार रुपये उकळले.https://maharashtramirror.com Pune Crime

काही दिवस उलटूनही प्रकृतीत किंवा कौटुंबिक परिस्थितीत कोणताही सकारात्मक बदल झाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. त्यांनी मोनाली विधातेकडे आपले पैसे परत मागितले असता, तिने पैसे देण्यास साफ नकार दिला आणि तक्रारदाराला गंभीर परिणामांची व जीवे मारण्याची धमकी दिली. https://maharashtramirror.com/ Pune crime

अखेर पीडित व्यक्तीने बिबवेवाडी पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून मोनाली विधाते व तिच्या इतर साथीदारांवर भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, खंडणी, धमकी देणे आणि 'महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्या'अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मोनाली विधाते ही सोनिया ठाकूर, मोनाली वावळ अशा विविध नावांनी वावरत असून तिची एक संपूर्ण टोळी या कामात सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या भोंदू महिलेने आणखी अनेक लोकांची अशाच प्रकारे फसवणूक केली असण्याची शक्यता असून, नागरिक किंवा इतर पीडितांनी पुढे येून तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. बिबवेवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शेयर करें