मुख्य सामग्री पर जाएँ

MNS Deepotsav : मनसेचा मोठा निर्णय; राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे दादरच्या शिवाजी पार्कातील प्रसिद्ध दीपोत्सव रद्द

•यंदा रोषणाई आणि आतषबाजी टाळून साधेपणाने साजरी होणार दिवाळी; राज ठाकरे यांच्याकडून संवेदनशीलतेचा परिचय.

व
विवेक

1 मिनट पठन

MNS Deepotsav : मनसेचा मोठा निर्णय; राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे दादरच्या शिवाजी पार्कातील प्रसिद्ध दीपोत्सव रद्द

•यंदा रोषणाई आणि आतषबाजी टाळून साधेपणाने साजरी होणार दिवाळी; राज ठाकरे यांच्याकडून संवेदनशीलतेचा परिचय.

मुंबई :- महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेली भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरवर्षी मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर राज ठाकरे यांच्या पक्षाकडून अत्यंत दिमाखात साजरा केला जाणारा लोकप्रिय 'दीपोत्सव' यंदा रद्द करण्यात आला आहे.

राज्यात शेतकरी वर्गावर आलेले संकट आणि पिण्याच्या पाण्याची व चारे्याची गंभीर समस्या पाहता अशा वातावरणात मोठा उत्सव साजरा करणे योग्य ठरणार नाही, असे मत मांडत मनसेने यंदा शिवाजी पार्कवर रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी यंदा केवळ पारंपरिक कंदील लावून अत्यंत साधेपणाने दिवाळी साजरी केली जाणार आहे.

दुष्काळग्रस्त भागांवर लक्ष केंद्रित करणार; राजकीय वर्तुळातून कौतुक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत ग्रामीण महाराष्ट्रातील स्थितीचा आढावा घेतला असून, दिवाळीनंतर दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करण्याची योजना आखली आहे. उत्सवावर होणारा खर्च टाळून तो पैसा दुष्काळ निवारणासाठी व पीडित नागरिकांच्या मदतीसाठी वापरला जावा, असा संदेश याद्वारे देण्यात आला आहे.

राजकीय पक्षांनी अशा कठीण प्रसंगी सामाजिक जाणिवा व संवेदनशीलता दाखवणे गरजेचे असल्याचे सांगत मनसेच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

हेही वाचा: Sunday Railway Mega Block : रेल्वे प्रवाशांचे हाल; मध्य आणि पश्चिम रेल्वेवर या आठवड्यात मेगाब्लॉक

शेयर करें