Mithi River Desilting Scam : मिठीनदी कंत्राट घोटाळ्यात धक्कादायक प्रकार समोर पोलिसांकडून अहवाल सादर कंत्राटदारांची चौकशी
•आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने मिठी नदीचा कथित घोटाळ्याबाबत पोलिसांकडून धक्कादायक माहिती
2 मिनट पठन

•आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने मिठी नदीचा कथित घोटाळ्याबाबत पोलिसांकडून धक्कादायक माहिती
मुंबई :- आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराबाबत प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे.प्रकल्पाशी संबंधित 10 कंत्राटदारांची चौकशी करण्यात आली असून त्याशिवाय कंत्राट प्रक्रियेसंदर्भातील माहिती महापालिकेकडे पोलिसांनी मागितली आहे. तसेच मिठी नदीतील गाळ काढतानाची चित्रफीतही पोलिसांनी मागितली आहे.
याप्रकरणी विशेष तपास पथकाने कंत्राटदारांना समन्स पाठवून चौकशीला बोलावले होते. आतापर्यंत त्यातील दहा जणांची चौकशी करण्यात आली आहे. या कंत्राटदारांना मिळालेल्या कंत्राटाबाबत राबवण्यात आलेल्या प्रक्रियेची माहिती पोलिसांनी मागितली आहे. चौकशीदरम्यान आत्तापर्यंत एकुण 9 जागांचे MOU पडताळण्यात आले असता, काही MOU यर कंत्राटदाराच्या जागेवर दुस-या व्यक्तीने स्वाक्षरी केलेली आहे, काही MOU वर कंत्राटदाराची स्वाक्षरीच नाही, काही MOU वर तारीख टाकण्यात आलेली नाही. या MOU बाबत जागा मालकांकडे चौकशी केली असता त्यांनी असे कोणतेही MOU केलेले नसल्याचे, MOU वरील स्वाक्षरी त्यांची नसल्याचे व त्यांच्या जागेवर गाळ टाकण्यात आला नसल्याचे सांगितले आहे. यावरुन कंत्राटदार कंपन्यां 1) ॲक्युट डिझाईन्स, 2) कैलास कंन्स्ट्रक्शन कंपनी, 3) एन.ए. कन्स्ट्रक्शन, 4) निखील कंन्स्ट्रक्शन कंपनी, 5) जे. आर. एस इन्फ्रास्ट्रक्चर यांनी खोटे व बनावट एमओयु सादर केले असून, महानगरपालीकेच्या पर्जन्य जल वाहिन्या विभागातील अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची सत्यता पडताळणी न करता कंत्राटदारांशी संगनमत करुन त्यांना गैरलाभ मिळवून दिला असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
महानगरपालीकेच्या पर्जन्य जल वाहिन्या विभागातील राहायक अभियंता तथा पदनिर्देशित अधिकारी प्रशांत रामुगडे, उप प्रमुख अभियंता (पजया), पुर्व उपनगरे (प्र.), गणेश बेंद्रे, उप प्रमुख अभियंता (प्रवप) पजवा (प्र.), तायशेट्टे व इतर यांनी आपल्या पदाचा आर्थिक फायदयाकरीता गैरवापर करून सिल्ट पुशर मशिन व मल्टीपर्पज ॲम्फीबिअस पॅटून मशिन संदर्भात महानगरपालीकेच्या निविदेमध्ये अटी व शर्थीचा समावेश करुन मॅटप्रॉप कंपनीचे दिपक मोहन, किशोर मेनन, मे. विरगो स्पेशालीटीज् प्रा.ली. चे जय जोशी, इतर भागीदार व संचालक, व्होडर इंडिया एलएलपीचे केतन कदम, इतर भागीदार व संचालक आणि ठेकेदार भुपेंद्र पुरोहित व इतर यांनी संगनमत करुन, कट रचून महानगरपालीकेची आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. अशा प्रकारे बृहन्मुंबई महानगरपालीकेची रु. 65.54 कोटी एवढ्या रक्कमेची फसवणूक केली आहे.
आझाद मैदान पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हयामध्ये सहभागी असलेले महानगरपालीकेचे अधिकारी, कंत्राटदार कंपन्या आणि मॅटप्रॉप, विरगो आणि व्होडर कंपनीचे संचालक व अधिकारी यांचेविरोधात कलम 406,409,420,465,467,468,471,120 (ब) भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरचा गुन्हा पुढील तपासाकरीता आर्थिक गुन्हे विभाग येथे वर्ग करण्यात आला असून अन्वये पुनर्कमांकित करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे.
