मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : मिशन लक्ष्यवेध: कुस्ती खेळाच्या निवड चाचणीचे पुन्हा आयोजन

Pune News :पुणे- महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे विभाग यांच्यातर्फे ‘मिशन लक्ष्यवेध’ या योजनेअंतर्गत पुणे विभागाच्या विभागीय क्रीडा निपुणता केंद्राकरिता कुस्ती (मुले) खेळाच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

मिशन लक्ष्यवेध: कुस्ती खेळाच्या निवड चाचणीचे पुन्हा आयोजन
मिशन लक्ष्यवेध: कुस्ती खेळाच्या निवड चाचणीचे पुन्हा आयोजन

Pune News :पुणे- महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे विभाग यांच्यातर्फे ‘मिशन लक्ष्यवेध’ या योजनेअंतर्गत पुणे विभागाच्या विभागीय क्रीडा निपुणता केंद्राकरिता कुस्ती (मुले) खेळाच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन, पायाभूत सुविधा आणि खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यापूर्वी आयोजित केलेल्या चाचणीत कुस्ती खेळासाठी अल्पसा प्रतिसाद मिळाल्यामुळे, कुस्ती (मुले) या खेळाची पुन्हा निवड चाचणी घेण्यात येत आहे. ही निवड चाचणी शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे बुधवारी (दि.४)सकाळी नऊ वाजता आयोजित केली आहे. https://maharashtramirror.com/ Pune News

अधिक माहितीसाठी उदय शेळके (८६०५८२१७८५) किंवा आकाश सलगर (९२८४८०६००३) यांच्याशी संपर्क साधवा. निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी सोबत जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत २ वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र आणि शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र ही मूळ कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. खेळाडूंनी स्वतःची निवास व भोजन व्यवस्था करावयाची आहे. अधिकृत राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग किंवा राज्यस्तरीय स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त आणि २५ वर्षाआतील (त्या वर्षाच्या ३१ डिसेंबर रोजी) इच्छुक खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा पुणे विभागाचे उपसंचालक युवराज नाईक यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें