मुख्य सामग्री पर जाएँ

सोसायटीच्या सभेत सभासदावर शस्त्राने हल्ला

संशयिताने जुन्या तक्रारीचा राग मनात धरला

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

सोसायटीच्या सभेत सभासदावर शस्त्राने हल्ला

संशयिताने जुन्या तक्रारीचा राग मनात धरला

पिंपरी: सोसायटीची सभा सुरू असताना जुन्या तक्रारीचा राग मनात धरून एका सभासदावर शस्त्राने हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवारी (१६ मे) रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास चऱ्होली येथील तनिष पार्क सोसायटीमध्ये घडली.

या प्रकरणात बाळासाहेब पोपटराव झोडगे (५८, चऱ्होली बुद्रुक) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश बाबूराव साने (४२, तनिष पार्क, चऱ्होली) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी झोडगे राहत असलेल्या सोसायटीची विशेष सभा शनिवारी रात्री सुरु होती. त्यावेळी आरोपीने मागील तक्रारींच्या कारणावरून झोडगे यांच्या डोक्यात व पाठीवर शस्त्राने वार केले. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. दिघी पोलीस तपास करत आहेत.

शेयर करें