मुख्य सामग्री पर जाएँ

Medha Kulkarni Vat Purnima Controversy: खासदार मेधा कुलकर्णींच्या वटपूजेवरून पुण्यात राजकीय वातावरण तापले!

"स्थानिक महिलांच्या आग्रहास्तव गेले"; टीकेनंतर खासदार मेधा कुलकर्णींचे स्पष्टीकरण.

म
मुबारक

2 मिनट पठन

Medha Kulkarni Vat Purnima Controversy: खासदार मेधा कुलकर्णींच्या वटपूजेवरून पुण्यात राजकीय वातावरण तापले!

"स्थानिक महिलांच्या आग्रहास्तव गेले"; टीकेनंतर खासदार मेधा कुलकर्णींचे स्पष्टीकरण.

Medha Kulkarni Vat Purnima Controversy: पुणे, महाराष्ट्र मिरर
पुण्यातील ऐतिहासिक आणि पुरोगामी विचारांचे केंद्र असलेल्या ‘महात्मा फुले वाड्या’मध्ये भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी वटपौर्णिमा साजरी केल्याने (Medha Kulkarni Vat Purnima Controversy)महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या पूजेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधक आणि पुरोगामी संघटनांनी खासदार कुलकर्णी यांच्यावर तीव्र आक्षेप घेत गंभीर आरोप केले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अत्यंत आक्रमक आणि बोचरी भूमिका घेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. (Medha Kulkarni Vat Purnima Controversy sushma andhare criticized mp medha kulkarni over phule wada pooja)

अंधारे यांचा थेट प्रहार: "हा शुद्ध हलकटपणा"

सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni Vat Purnima Controversy) यांच्या पूजेचे फोटो शेअर करत आपली अधिकृत पोस्ट प्रसिद्ध केली आहे. आपल्या पोस्टमध्ये अंधारे यांनी अत्यंत कडक शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

"मेधा कुलकर्णींनी जाणीवपूर्वक कोथरूडमधले सगळे वड सोडून ठरवून फुले वाड्यात येणे हा आचरटपणा नाही, तो शुद्ध हलकटपणा होता. त्याहीपेक्षा एका ऐतिहासिक वास्तूमध्ये दरवर्षी ठरवून हेतूपुरस्सर हे चालवले जाते आणि तरीसुद्धा त्यावर राज्याचे गृहमंत्री दुर्लक्ष करतात, हे एक सुनियोजित कटकारस्थान आहे," असा घणाघाती आरोप अंधारे यांनी केला.

हेही वाचा: CRIME NEWS: हवालदाराची भाईगिरी! एपीआयला ठाण्यातच मारहाण; महिला पोलिसांबरोबर गैर वर्तनामुळे निलंबन

पुढे बोलताना त्यांनी आमदार आणि खासदारांच्या पात्रतेवरही बोट ठेवत, "सध्या अशा लोकांना लोकप्रतिनिधी केले जात आहे ज्यांचा विवेकाशी अजिबात संबंध नाही आणि ज्यांचे कर्तृत्व शून्य आहे," असा टोला लगावला.(Medha Kulkarni Vat Purnima Controversy)

पुरोगामी चळवळीतून तीव्र आक्षेप

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा, आणि सनातन कर्मकांडाच्या विरोधात लढा दिला. ज्या वास्तूतून त्यांनी सत्यशोधक विचारांचा प्रसार केला आणि बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुली केली, त्याच वाड्यात कडेकोट सरकारी बंदोबस्तात पारंपरिक धार्मिक पूजा अर्चा करणे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना आणि विचारवंतांना अजिबात रुचलेले नाही.(Medha Kulkarni Vat Purnima Controversy)

ओबीसी संघर्ष समिती आणि विविध सामाजिक संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. "हा केवळ वैयक्तिक श्रद्धेचा भाग नसून, महात्मा फुलेंच्या क्रांतीभूमीचे ‘सनातनीकरण’ करण्याचा हा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. हा बहुजन समाजाच्या अस्मितेला आणि फुलेंच्या पुरोगामी विचारांना दिलेले थेट आव्हान आहे," अशी भावना आंदोलक आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

खासदार मेधा कुलकर्णींचे स्पष्टीकरण

या वाढत्या वादामुळे आणि टीकेच्या झोडीनंतर खासदार मेधा कुलकर्णी यांनी आपली बाजू मांडली आहे. "हा कार्यक्रम मी आयोजित केला नव्हता. स्थानिक महिला आणि कार्यकर्त्यांनी या पूजेचे आयोजन केले होते आणि त्यांनी मला आमंत्रित केल्यामुळे मी तिथे गेले होते," असे स्पष्टीकरण कुलकर्णी यांनी दिले आहे. तसेच, राज्य पुरातत्व विभागाच्या परवानगीनेच हा कार्यक्रम पार पडल्याचा दावाही त्यांनी केला असून, अशा पारंपरिक प्रथा अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मात्र, पुरातत्व विभागाची सुरुवातीची बंदी आणि नंतर मिळालेली परवानगी यावरूनही आता प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सुषमा अंधारे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि पुरोगामी संघटनांच्या वाढत्या विरोधामुळे पुण्यात आगामी काळात राजकीय वातावरण आणखी तापण्याची आणि हा वाद पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

शेयर करें