मुख्य सामग्री पर जाएँ

भाईंदरच्या 'कस्तुरी हाइट्स' इमारतीला भीषण आग! - धुरामुळे सहा रहिवाशांची प्रकृती अस्थिर, दीड वर्षांच्या बाळासह पीडितांवर उपचार सुरू

• इलेक्ट्रिकल बॉक्सने घेतला पेट, इमारतीत दाट धुराचे लोट; अग्निशमन दलाचे 100 हून अधिक रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

व
विवेक

1 मिनट पठन

भाईंदरच्या 'कस्तुरी हाइट्स' इमारतीला भीषण आग! - धुरामुळे सहा रहिवाशांची प्रकृती अस्थिर, दीड वर्षांच्या बाळासह पीडितांवर उपचार सुरू

•इलेक्ट्रिकल बॉक्सने घेतला पेट, इमारतीत दाट धुराचे लोट; अग्निशमन दलाचे 100 हून अधिक रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

भाईंदर :- भाईंदरच्या इंद्रलोक फेज-6 परिसरात असलेल्या 'कस्तुरी हाइट्स' या इमारतीत काल (सोमवारी) दुपारी 12 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या इलेक्ट्रिकल बॉक्सने अचानक पेट घेतल्याने ही आग लागली. काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण इमारतीत दाट धुराचे लोट पसरल्याने मोठी खळबळ उडाली.

धुरामुळे सहा जण बाधित

आग लागल्यामुळे खालच्या मजल्यावरील रहिवाशांनी तातडीने इमारत रिकामी केली, मात्र वरच्या मजल्यांवरील शंभरहून अधिक नागरिक धुरामुळे अडकून पडले होते.अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत एका बाजूला रहिवाशांची सुटका करण्यास सुरुवात केली, तर दुसऱ्या बाजूला आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.या दुर्घटनेत धुरामुळे सहा जणांची प्रकृती अस्थिर झाली. यामध्ये दीड वर्षांच्या हिमांशू भट आणि प्रियंका सिंह यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्य, तसेच पाल कुटुंबातील एका व्यक्तीचा समावेश आहे. या सर्वांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अग्निशमन दलाला काही वेळातच आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.

शेयर करें