मुख्य सामग्री पर जाएँ

Sambhajinager News : मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; जायकवाडी वगळता सर्व धरणांचे पाणी पिण्यासाठी राखीव

Sambhajinager News :संभाजीनगर – मराठवाड्यावर यंदा दुष्काळाचे संकट गडद होऊ लागले आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; जायकवाडी वगळता सर्व धरणांचे पाणी पिण्यासाठी राखीव सरासरीपेक्षा कमी पावसामुळे विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय; रब्बी हंगामाचे नियोजन न करण्याच्या सूचना
मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; जायकवाडी वगळता सर्व धरणांचे पाणी पिण्यासाठी राखीव सरासरीपेक्षा कमी पावसामुळे विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय; रब्बी हंगामाचे नियोजन न करण्याच्या सूचना

Sambhajinager News : सरासरीपेक्षा कमी पावसामुळे विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय; रब्बी हंगामाचे नियोजन न करण्याच्या सूचना

Sambhajinager News :संभाजीनगर – मराठवाड्यावर यंदा दुष्काळाचे संकट गडद होऊ लागले आहे. जून ते ऑगस्ट या मान्सून कालावधीत विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिके संकटात आली असून, अनेक धरणे अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत.https://maharashtramirror.com/ sambhajinager News
पावसाने दडी मारल्याने आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी जायकवाडी धरण वगळता मराठवाड्यातील इतर सर्व धरणांतील पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेशही जारी करण्यात आले आहेत.https://maharashtramirror.com/ sambhajinager news
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी संबंधित यंत्रणांना पाण्याच्या उपलब्ध स्रोतांचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या-ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत, ते शंभर टक्के पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, सध्याची पाणीस्थिती लक्षात घेता रब्बी हंगामासाठी कोणतेही नियोजन करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत उपलब्ध जलसाठ्याचा वापर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
दरम्यान, आदेशाचे उल्लंघन करून पाण्याचा अनधिकृत वापर केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील घटत्या जलसाठ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

शेयर करें