मुख्य सामग्री पर जाएँ

Marathi News | मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री वेश्या व्यवसायात सापडली; मुंबई पोलिसांनी केली सुटका

मुंबई, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : मुंबई पोलिसांनी गिरगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश करत दोन अभिनेत्रींची सुटका केली आहे.

म
मुबारक

1 मिनट पठन

marathi actress found in sex racket

मुंबई, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : मुंबई पोलिसांनी गिरगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश करत दोन अभिनेत्रींची सुटका केली आहे. या कारवाईदरम्यान एका दलालाला रंगेहाथ अटक करण्यात आली असून, तो सेलिब्रिटींसोबत काम करणारा मेकअप आर्टिस्ट असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. Marathi News

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्या दोन महिलांपैकी एक मराठी चित्रपटसृष्टीतील प्रमुख अभिनेत्री आहे, तर दुसरीने बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये कॅमिओ भूमिका साकारल्या आहेत. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकत ही कारवाई केली. घटनास्थळावरून दोन्ही महिलांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून, दलालाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास मानवी तस्करी, जबरदस्ती किंवा अन्य कोणते गुन्हे घडले आहेत का, या दृष्टीनेही केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून, त्यांना आवश्यक ती मदत आणि समुपदेशन उपलब्ध करून देण्यात येत आहे.

मुंबई पोलिसांनी गिरगाव येथील एका हॉटेलमध्ये कथित वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश करून दोन अभिनेत्रींची सुटका केली—एक मराठी लीड आणि दुसरी बंगाली आणि बॉलीवूड कॅमिओ भूमिकांशी संबंधित. एक पिंप, कथितरित्या सेलिब्रिटींशी जोडलेला मेकअप आर्टिस्ट, या दरम्यान रंगेहात पकडला गेला… pic.twitter.com/gnSapgTojI — IANS (@ians_india) 27 जून 2026

तुर्भे नाका येथील एका लॉजमध्ये ग्राहकांकडून भरमसाट पैसे उकळून महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई केली होती. पोलिसांनी लॉजवर बनावट ग्राहक पाठवला आणि बेकायदेशीर कृतीची पुष्टी होताच, पथकाने तत्काळ छापा टाकला. छाप्यादरम्यान पोलिसांना लॉजच्या खोल्यांमध्ये सात महिला सापडल्या, ज्यांना वेश्याव्यवसायासाठी ठेवण्यात आले होते.

आरोपी एकमेकांच्या संगनमताने महिलांना लॉजमध्ये बसवायचे आणि ग्राहकांना दाखवल्यानंतर त्यांच्या मर्जीनुसार सौदा ठरविल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. वेश्याव्यवसायातून मिळणारे पैसे आपापसात वाटून घेतले. बनावट ग्राहकाकडून घेतलेली रक्कमही पोलिसांनी जप्त केली होती.

https://maharashtramirror.com/shoeb-akhtar-brother-dead-last-ride-attention/

शेयर करें