मुख्य सामग्री पर जाएँ

Manghal vedha News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवेढा कडकडीत बंद

Manghal vedha News: मंगळवेढा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवली सराटी येथील बेमुदत उपोषणावर अद्याप तोडगा न निघाल्याने मंगळवेढ्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवेढा कडकडीत बंद वैद्यकीय सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार ठप्प
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवेढा कडकडीत बंद वैद्यकीय सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार ठप्प

Manghal vedha News: वैद्यकीय सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार ठप्प


Manghal vedha News: मंगळवेढा :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवली सराटी येथील बेमुदत उपोषणावर अद्याप तोडगा न निघाल्याने मंगळवेढ्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाने केलेल्या बंदच्या आवाहनाला शहरातील व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे मंगळवेढा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून, वैद्यकीय सेवा वगळता बहुतांश व्यवहार ठप्प झाले आहेत.https://maharashtramirror.com/ Manghal vedha News
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत शहरातील दामाजी चौकात सकल मराठा समाजाच्या बांधवांनी ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था तब्बल दोन तास विस्कळीत झाली होती. त्यावेळी आरक्षणाच्या प्रश्नावर तातडीने तोडगा न निघाल्यास मंगळवेढा बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता.https://maharashtramirror.com/ Manghal vedha News
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी यापूर्वी उभारलेल्या विविध आंदोलनांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील, विशेषतः मंगळवेढ्यातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. यावेळीही जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून फेरी काढली. https://maharashtramirror.com/ Manghal vedha News
शहरातील व्यापाऱ्यांनीही मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देत बंदमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यात आल्या असून, इतर बहुतांश व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, मंगळवेढा शहराबरोबरच ग्रामीण भागातूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. बोराळे, मरवडे, खोमनाळ, भाळवणी, भोसे, सरगर बुद्रुक, आंधळगाव, पटकन, डोंगरगाव, ढवळस, ब्रह्मपुरी, मारापुर, घरनिकी, फटेवाडी, भालेवाडी आणि रहाटेवाडी आदी गावांमधून मराठा आरक्षणाच्या लढ्याला समर्थन व्यक्त करण्यात येत आहे.

शेयर करें