Sambhajinager News : जरांगेंनी घेतले उपोषण मागे
Sambhajinager News : छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण अखेर २०व्या दिवशी मागे घेतले.
2 मिनट पठन

Sambhajinager News : २० दिवसांचे आंदोलन अखेर संपले; मुख्यमंत्र्यांनी केले समाधान व्यक्त
Sambhajinager News : छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण अखेर २०व्या दिवशी मागे घेतले. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देत समाधान व्यक्त केलं. Sambhajinager News https://maharashtramirror.com/
“मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं याचा मला आनंद आहे. आम्ही त्यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या १३ पैकी १२ मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. एका मागणीच्या बाबतीत कायदेशीर अडचण असल्याने ती मान्य करता आली नाही आणि त्याबाबत त्यांना माहिती देण्यात आली,” असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. Sambhajinager News https://maharashtramirror.com/
सरकारच्या उपसमितीने जरांगे पाटील यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी पुढील काळात आवश्यक बैठका घेतल्या जातील, तसंच प्रशासकीय पातळीवर निर्णय घेऊन आश्वासनांची पूर्तता केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सरकारची भूमिका सकारात्मक असून, चर्चेसाठी सरकारचे दरवाजे खुले असल्याचे फडणवीस म्हणाले. मराठा समाजासाठी त्यांच्या सरकारच्या काळात अनेक निर्णय घेण्यात आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. Sambhajinager News https://maharashtramirror.com/
दरम्यान, हे आंदोलन संपल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात निर्माण झालेले विघ्न दूर झाल्याचे सांगत फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. या संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य करणारे विखे पाटील, प्रसाद लाड आणि एकनाथ शिंदे यांचेही त्यांनी आभार मानले. “उपोषण संपलं याचा मला आनंद आहे,” असं म्हणत त्यांनी आंदोलन मागे घेतल्याचं स्वागत केलं.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा सप्ताहा’चीही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महिनाभर विविध ठिकाणी जनसेवेचे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, त्यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं.
कोट
“मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं याचा मला आनंद आहे. आम्ही त्यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या १३ पैकी १२ मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. एका मागणीच्या बाबतीत कायदेशीर अडचण असल्याने ती मान्य करता आली नाही आणि त्याबाबत त्यांना माहिती देण्यात आली.” - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
