मुख्य सामग्री पर जाएँ

Jalana News : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; ११व्या दिवशीही उपोषण सुरूच

Jalana News : जालना : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे मागील दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती समोर आली आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; ११व्या दिवशीही उपोषण सुरूच शुगर लेव्हल कमी, सात किलो वजन घटले
मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; ११व्या दिवशीही उपोषण सुरूच शुगर लेव्हल कमी, सात किलो वजन घटले

Jalana News : सात किलो वजन घटले



Jalana News : जालना : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे मागील दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी (दि. ८) त्यांच्या उपोषणाचा अकरावा दिवस असून, प्रकृती बिघडत असतानाही त्यांनी उपोषण सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे.https://maharashtramirror.com/ jalana News
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पत्रकार परिषदेदरम्यान माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांना उलट्या झाल्या. त्यानंतर मध्यरात्री त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने जालना येथील सिव्हिल सर्जन यांनी त्यांची तपासणी केली. तपासणीत त्यांची शुगर लेव्हल मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे तसेच उपोषणाच्या काळात त्यांचे सुमारे सात किलो वजन घटल्याचे समोर आले आहे.https://maharashtramirror.com/ jalana News
प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत आणि प्रसाद लाड यांनी सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास फोनवरून मनोज जरांगे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी जरांगे यांना सलाईन घेण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांच्या विनंतीला मान देत मनोज जरांगे यांनी सलाईन लावून घेतले. त्यांना चार सलाईन देण्यात आल्याची माहिती आहे.https://maharashtramirror.com/ Jalana News
काही दिवसांपूर्वी सरकारच्या विनंतीनंतर मनोज जरांगे यांनी एकदा पाणी घेतले होते. मात्र, उपोषण मागे घेण्याच्या मागणीला त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी सरकारला १२ सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी १२ सप्टेंबर रोजी सर्व मराठा बांधवांनी अंतरवाली सराटी येथे जमावे, असे आवाहन केले आहे. त्यानंतर मुंबईकडे कूच करण्याची पुढील तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास पोलीस यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेयर करें