Political News: मंत्र्याचे शिष्टमंडळ जरांगे यांच्याबरोबर चर्चा करणार
शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश
1 मिनट पठन

Political News: शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश
Political News: छत्रपती संभाजीनगर : समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ यांनी आपल्या विरोधकांना बळ दिले, त्यात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे होते. अशी टीका केल्यानंतर जरांगे यांचा सूर सौम्य व्हावा म्हणून नुकतेच त्यांची आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांची भेट घेतली. या पुढील टप्प्यात आता पुन्हा एकदा उद्योगमंत्री उदय सामंत. मंत्री शंभुराज देसाई, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत.
२९ ऑगस्ट पासून पुन्हा एकदा अंतरवली सराटी येथे उपोषण करण्याचा इशारा मनाेज जरांगे यांनी स्पष्ट केला आहे. उपोषणाच्या या टप्प्यात जात पडताळणीमुळे निर्माण झालेले प्रश्न चर्चेत आणले जात आहेत. जात पडताळणी समिती ही अर्धन्यायिक व्यवस्था असल्याने या प्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नाही, असे जरांगे यांना वारंवार सांगितले जात आहे. दुसरीकडे जात पडताळणी समिती हवीच कशाला असाही प्रश्न विचारला जात आहे. महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांमध्ये जात पडताळणीची व्यवस्थाच नसल्याचे सांगण्यात येते.
जातीचे दाखले देतानाच सर्व निकष तपासले जातात. परिणामी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यास राज्यात नियुक्ती मिळाल्यास त्याच्या जातीचे प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर जात नाही. मात्र, एखाद्याला शिपाई पदाची नियुक्ती मिळाली तरी त्याला पडताळणीच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागते, हे वास्तव काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सरकारपर्यंत पोहचवले आहे.परिणामी या अनुषंगाने काही मागण्या मराठा आंदोलकांकडून केल्या जात आहेत. दरम्यान राज्य सरकारने काही शासन निर्णयात बदल करावेत अशा सूचनाही मांडण्यात आल्या आहेत. ही प्रशासकीय पातळीवर सुरू असणाऱ्या चर्चेला जरांगे यांनी राजकीय पटलावर नेत चंद्रशेखर बावनकुळे यांना टीकेचे लक्ष्य केले होते. आता राधाकृष्ण विखेपाटील, प्रसाद लाड, उदय सामंत, शंभुराज देसाई हे अंतरवलीकडे जात आहेत.
