मुख्य सामग्री पर जाएँ

Mumbai news : मनोज जरांगेंचं सरकारला थेट आव्हान ;मुंबईला एकट्याने जाण्याचा निर्धार

Mumbai news : मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे आणि सरकार यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

मनोज जरांगेंचं सरकारला थेट आव्हान ;मुंबईला एकट्याने जाण्याचा निर्धार
मनोज जरांगेंचं सरकारला थेट आव्हान ;मुंबईला एकट्याने जाण्याचा निर्धार

Mumbai news : मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे आणि सरकार यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता आहे. शनिवारी (दि.१९) आझाद मैदानात आमरण उपोषण करण्यासाठी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “आझाद मैदानात कोण मला अडवतो ते बघतो. दम असेल तर अडवा!” असं थेट आव्हान त्यांनी सरकार आणि प्रशासनाला दिलं आहे.https://maharashtramirror.com/
मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी (दि.१९) आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला होता. या आंदोलनासाठी त्यांनी आझाद मैदान पोलिसांना हमीपत्रही दिलं होतं. मात्र, गेल्या वर्षीच्या आंदोलनातील नियम आणि अटींचा भंग झाल्याचा दाखला देत पोलिसांनी यंदाच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.https://maharashtramirror.com/
पोलिसांच्या या निर्णयानंतर जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.
“मंगळवारी (दि.१५) मी एकटा मुंबईत जातो. कोण मला परवानगी देत नाही तेच बघतो. दम असेल तर अडवा,” असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

‘जो मार्ग ठरला, त्याच मार्गाने मुंबईला जाणार’


परवानगी नाकारण्यात आली असली तरी आपण मुंबईला जाणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. “जो मार्ग ठरला आहे, त्याच मार्गाने मी मुंबईला जाणार,” अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तसेच, योग्य वेळी मराठा बांधवांनाही मुंबईत बोलावलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
त्यामुळे आता प्रशासन आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जरांगे यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा


मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. “सणावारांच्या आडून मराठ्यांवर वार केला आहे. मी एकटा गेलो तर मला परवानगी देतील का?” असा सवाल करत त्यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतरही मुंबईत जाण्याचा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केल्याने आगामी काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. आता मनोज जरांगे पाटील मुंबईत कधी दाखल होणार आणि प्रशासन त्यांना कशाप्रकारे रोखणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

शेयर करें