मुख्य सामग्री पर जाएँ

Nagpur News : जरांगेंनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार; अडीच वर्षांनंतर क्लिप समोर आणण्यामागचा हेतू काय? – देवेंद्र फडणवीस

Nagpur News :नागपूर : पाचशे कोटी रुपयांच्या आरोपांवरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोर ऑडिओ क्लिप सादर केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

जरांगेंनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार; अडीच वर्षांनंतर क्लिप समोर आणण्यामागचा हेतू काय? – देवेंद्र फडणवीस
जरांगेंनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार; अडीच वर्षांनंतर क्लिप समोर आणण्यामागचा हेतू काय? – देवेंद्र फडणवीस

Nagpur News :नागपूर : पाचशे कोटी रुपयांच्या आरोपांवरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोर ऑडिओ क्लिप सादर केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून, समोर आलेल्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच, हे संभाषण अडीच वर्षांनंतरच समोर आणण्यामागचा नेमका हेतू काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.https://maharashtramirror.com/ Nagpur News

नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केले. शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्यांच्या भेटीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, समोर आलेल्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येईल, असे आश्वासन आपण संबंधितांना दिले आहे.

‘अडीच वर्षांनंतरच ऑडिओ क्लिप समोर का?’

या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करताना फडणवीस म्हणाले, “आम्हा सर्वांनाच एक प्रश्न पडला आहे की, अडीच वर्षांनंतर हे संभाषण बाहेर येण्यामागचा नेमका हेतू काय आहे? यातून कुणाला लक्ष्य केले जात आहे, असे अनेक प्रश्न आहेत.”

मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या शिष्टमंडळासह भाजपकडूनही चौकशीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यातील सत्य समोर आणले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आता या ऑडिओ क्लिपच्या फॉरेन्सिक तपासणीतून काय निष्पन्न होते आणि या प्रकरणातील आरोपांबाबत कोणती माहिती समोर येते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें