Nashik Crime : मालेगाव हादरवणारी घटना: ४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा
Nashik Crime : नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात सुमारे ११ महिन्यांपूर्वी (नोव्हेंबर २०२५) घडलेल्या अत्यंत संतापजनक आणि मानवी मन हेलावून टाकणाऱ्या प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे.
1 मिनट पठन

Nashik Crime : नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात सुमारे ११ महिन्यांपूर्वी (नोव्हेंबर २०२५) घडलेल्या अत्यंत संतापजनक आणि मानवी मन हेलावून टाकणाऱ्या प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. मालेगाव फास्टट्रॅक कोर्टाने या खटल्याची अंतिम सुनावणी घेत नराधम आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला न्याय मिळाला आहे.https://maharashtramirror.com/ Nashik Crime
काय होता घटनाक्रम?
नोव्हेंबर २०२५ मध्ये डोंगराळे येथील एका चार वर्षीय चिमुकलीला आरोपी विजय खैरनार (वय २९) याने चॉकलेटचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले होते. त्यानंतर अत्यंत अमानुषपणे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पीडित चिमुकली आरोपीला 'दादा' म्हणत असे, मात्र या नराधमाने आपल्याच नात्याला आणि 'दादा' या पवित्र नावाला काळीमा फासला होता. या घटनेमुळे राज्यभरातून संतापाची लाट पसरली होती आणि आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत होती.
ॲड. उज्ज्वल निकम यांच्या युक्तिवाधाला यश
या अत्यंत संवेदनशील आणि हायप्रोफाइल खटल्यात प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कोर्टात भक्कम पुरावे आणि प्रभावी युक्तिवादाच्या आधारे आरोपीचे गुन्हे सिद्ध करण्यात आले.
न्यायालयाचा मोठा निर्णय
मालेगाव फास्टट्रॅक कोर्टाने या खटल्याची सुनावणी पूर्ण करत आरोपी विजय खैरनार याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय, पीडितेच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या जलद गती निकालामुळे अल्पवयीन मुलीच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
