Pune Crime: माळेगाव बुद्रुक येथे तीन जणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला
Pune Crime: पुणे: माळेगाव बुद्रुक (ता.
1 मिनट पठन

Pune Crime: सहा जणांवर गुन्हा दाखल, किरकोळ वादातून घडली घटना
Pune Crime: पुणे: माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील तावरे पेट्रोल पम्पाजवळ जुन्या भांडणाचा राग मनात धरून टोळक्याने तिघांवर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले असून माळेगाव पोलीस ठाण्यात सहा जणांसह इतर सात ते आठ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
संदीप दत्तात्रय जगताप (वय ४६, रा. अमरसिंह कॉलनी, माळेगाव बु.), अनिकेत उदयसिंह धुमाळ (वय २७) आणि पृथ्वीराज अतुल निंबाळकर (वय २९) अशी या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दत्तात्रय संदीप जगताप (वय ४६) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. https://maharashtramirror.com/ Pune Crime
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.२८) रात्री आठच्या सुमारास तावरे पेट्रोल पम्पाजवळ फिर्यादी हे त्यांचे मित्र अनिकेत धुमाळ, पृथ्वीराज निंबाळकर व इतर मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते. यापूर्वी झालेल्या एका भांडणात अनिकेत धुमाळ याने मध्यस्थी करून भांडण सोडवले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी १) गणेश भोसले, २) शुभम मोरे, ३) मयूर रामचंद्र शितोळे, ४) प्रेम कांबळे, ५) हर्षद रणधीर आणि ६) भुमेश झेंडे यांच्यासह इतर ६ ते ७ जणांनी हातात धारदार लोखंडी कोयते घेऊन त्यांना गाठले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक साळवे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
