मुख्य सामग्री पर जाएँ

Maharashtra Weather Report : महाराष्ट्रात हवामानाचा लपंडाव! उष्णतेच्या लाटेनंतर आता विदर्भाला अवकाळीचा तडाखा बसणार; कोकणात धुक्याची चादर

Maharashtra Latest Weather Report : अमरावती, चंद्रपूर, अकोल्यात पारा 40 पार; बंगालच्या उपसागरातील 'द्रोणिके'मुळे पावसाचे संकट

व
विवेक

1 मिनट पठन

Mumbai Weather Update: Heat wave warning for 3 days in Mumbai from today, temperature likely to reach 40 degrees

Maharashtra Latest Weather Report : अमरावती, चंद्रपूर, अकोल्यात पारा 40 पार; बंगालच्या उपसागरातील 'द्रोणिके'मुळे पावसाचे संकट

नागपूर ,:- गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाचे चटके सहन करणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांसमोर आता नवीन संकट उभे ठाकले आहे. उष्णतेच्या लाटेपाठोपाठ आता राज्याच्या काही भागांत अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः विदर्भात 14 आणि 15 मार्च रोजी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता असून, काही ठिकाणी वादळी वाऱ्यांचा इशाराही देण्यात आला आहे.

विदर्भात पावसाचा,अंदाज:बंगालच्या उपसागरातील हालचालींचा परिणाम

नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात एक द्रोणिका (अप्पर टफ वे) तयार⁸ झाली आहे. याचा थेट परिणाम विदर्भातील हवामानावर होणार असून, पुढील दोन दिवसांत पावसासोबत ताशी 40 ते 59 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यानुसार सद्यस्थिती:

अमरावती: जिल्ह्याचे तापमान सध्या 40 सेल्सिअस अंशावर पोहोचले आहे. मात्र, पुढील दोन-तीन दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे.

चंद्रपूर आणि अकोला: या दोन्ही जिल्ह्यांत उष्णतेचा कडाका सर्वाधिक आहे. चंद्रपुरात पारा 40 अंशांवर, तर अकोल्यात 41 अंशांच्या पार गेला आहे. अकोल्यात पुढील 3-4 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून, प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

बुलढाणा: वाढत्या उष्णतेचा (39 अंश सेल्सिअस) मोठा फटका

पशुधनाला बसत आहे. गुरांचे आरोग्य बिघडल्याने दूध उत्पादनात घट होत असून, शेतकऱ्यांनी जनावरांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राने केले आहे.

कोकणात विचित्र हवामान
कोकण किनारपट्टीवर सध्या हवामानाचे दोन विरुद्ध टोकाचे अनुभव येत आहेत. सकाळी 9 वाजेपर्यंत सर्वत्र दाट धुक्याची चादर पाहायला मिळते, ज्यामुळे दृश्यमानता कमी होत आहे. मात्र, नऊ नंतर धुक्याची जागा कडक ऊन घेत असून नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे.

शेयर करें