Pune News : १५ ऑक्टोबरपूर्वी साखर कारखान्यांचे धुराडे पेटणार; दुष्काळी परिस्थितीमुळे लवकर गाळपाला परवानगी
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : राज्यातील ऊस गाळप हंगाम लवकर सुरू करण्याच्या निर्णयाला काही शेतकरी संघटनांकडून विरोध होत असतानाच, साखर कारखान्यांना १५ ऑक्टोबरपूर्वी गाळप हंगाम सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
1 मिनट पठन

शेतकरी संघटनांचा विरोध
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : राज्यातील ऊस गाळप हंगाम लवकर सुरू करण्याच्या निर्णयाला काही शेतकरी संघटनांकडून विरोध होत असतानाच, साखर कारखान्यांना १५ ऑक्टोबरपूर्वी गाळप हंगाम सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. गाळप परवाना मिळालेल्या कारखान्यांना निर्धारित तारखेपूर्वी हंगाम सुरू करता येईल, असे साखर आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भागांतील ऊस पिकावर परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांकडे उसाला पाणी देण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने ऊस लवकर तोडून कारखान्यांकडे पाठविण्याची मागणी होत असल्याचे साखर कारखानदारांकडून सांगण्यात येत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
राज्यातील ऊस गाळप हंगामाबाबत ९ सप्टेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीत १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कमी पावसामुळे राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पावसाअभावी बहुतांश भागांत ऊस पिकावर प्रतिकूल परिणाम झाला असून, पाण्याअभावी उभा ऊस वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.
लवकर गाळपावर संघटनांचा आक्षेप
दरम्यान, देशातील साखरेच्या वाढलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील गाळप हंगाम लवकर सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून दबाव असल्याचा आरोप काही शेतकरी संघटनांनी केला आहे. हंगाम निर्धारित वेळेपूर्वी सुरू केल्यास उसातील सुक्रोजचे प्रमाण अपेक्षेइतके विकसित झालेले नसू शकते. त्यामुळे साखरेचा उतारा कमी होऊन त्याचा परिणाम शेतकरी आणि साखर कारखान्यांना सहन करावा लागू शकतो, असा दावा या संघटनांनी केला आहे.
दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी लवकर गाळप सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न असला, तरी त्यातून साखरेच्या उताऱ्यावर होणारा परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला याबाबतचा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे.
