Maharashtra municipal Election : स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी गतीमान
Maharashtra municipal Election : महापालिका व नगरपालिकांना प्रभाग रचनेसाठी नगरविकास विभागाचा आदेश,मुंबईत 227 सदस्य कायम, इतर शहरांत बहु-सदस्यीय प्रभाग रचना निश्चित
1 मिनट पठन

Maharashtra municipal Election : महापालिका व नगरपालिकांना प्रभाग रचनेसाठी नगरविकास विभागाचा आदेश,मुंबईत 227 सदस्य कायम, इतर शहरांत बहु-सदस्यीय प्रभाग रचना निश्चित
मुंबई | राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. Maharashtra municipal Election सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नगरविकास विभागाने मोठा पाऊल उचलत सर्व 29 महानगरपालिका व 257 नगरपालिकांना तातडीने प्रभाग रचनेसंदर्भातील प्रस्ताव तयार करून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई महानगरपालिकेसाठी सदस्यसंख्या 227 वर स्थिर ठेवण्यात आली असून, एकसदस्यीय प्रभाग रचना कायम राहणार आहे. याआधी ठाकरे सरकारने ही संख्या 236 वर नेली होती, मात्र शिंदे सरकारने 8 सप्टेंबर 2022च्या निर्णयानुसार पूर्वस्थिती बहाल केली आहे. इतर महानगरपालिकांमध्ये मुख्यतः चार सदस्यीय प्रभाग रचना असून, विशेष परिस्थितीत तीन किंवा पाच सदस्यही शक्य आहेत. नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभागांची रचना ठरवण्यात आली आहे.
निवडणुकांचे बिगुल कधीही वाजू शकते, असे संकेत असून, आगामी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकांची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना गती मिळण्याची चिन्हे आहेत.
महापालिकांची प्रभागसंख्या
मुंबई : 227
ठाणे : 131
नवी मुंबई : 111
पुणे : 162
नागपूर : 151
पिंपरी-चिंचवड : 128
कल्याण-डोंबिवली : 122
पनवेल : 78
छत्रपती संभाजीनगर : 115
कोल्हापूर : 81
वसई- विरार : 115
मीरा-भाईंदर : 95
- #ठाणे महापालिका निवडणूक
- #Maharashtra Municipal Election News in Marathi
- #Maharashtra Municipal Election 2025
- #Navi Mumbai Election 2025
- #Maharashtra Government
- #Mumbai Municipal Election 2025
- #मुंबई महापालिका निवडणूक
- #नवी मुंबई निवडणूक 2025
- #election
- #One Corporator Per Ward Mumbai
- #निवडणूक 2024
- #महाराष्ट्र सरकार
- #महाराष्ट्र महापालिका निवडणूक 2025 मराठी बातम्या
- #Thane Municipal Corporation Election
- #मुंबई महानगरपालिका
- #BMC Elections
- #Four Corporators Other Cities
- #वॉर्डमधील नगरसेवक संख्या
- #Maharashtra Civic Polls 2025
- #Mumbai Municipal Corporation
