मुख्य सामग्री पर जाएँ

Mumbai News : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; निकषांत न बसणाऱ्या आणखी 19 तालुक्यांच्या फेरविचाराचे आदेश!'

Mumbai News : मुंबई :- महाराष्ट्रात यंदा पावसाच्या ओढ्यामुळे दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, राज्य सरकारने आतापर्यंत राज्यातील 265 तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; निकषांत न बसणाऱ्या आणखी 19 तालुक्यांच्या फेरविचाराचे आदेश!'
राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; निकषांत न बसणाऱ्या आणखी 19 तालुक्यांच्या फेरविचाराचे आदेश!'

Mumbai News : 10 ऑक्टोबरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश; केंद्र सरकारकडे 17 हजार कोटींच्या मदतीची मागणी' — कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Mumbai News :मुंबई :- महाराष्ट्रात यंदा पावसाच्या ओढ्यामुळे दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, राज्य सरकारने आतापर्यंत राज्यातील 265 तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे. या सर्व तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे अत्यंत वेगाने सुरू आहेत. दरम्यान, 25 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार (GR) ज्या तालुक्यांत 75 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, मात्र जे तांत्रिक निकषांत बसत नाहीत, अशा आणखी 19 तालुक्यांचा फेरविचार करून तातडीने प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.https://maharashtramirror.com/ Mumbai news

'10 ऑक्टोबरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण; 1 कोटी 49 लाख हेक्टरपैकी 65 लाख हेक्टरचे काम पूर्ण'
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील पंचनाम्यांच्या कामाचा सविस्तर आढावा मांडला: पंचनाम्यांची स्थिती: राज्यात एकूण 1 कोटी 49 लाख हेक्टर बाधित क्षेत्रापैकी सुमारे 65 लाख 26 हजार हेक्टर (43 टक्के) जमिनीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अंतिम मुदत: महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी थेट शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करत असून 10 ऑक्टोबर 2026 पर्यंत सर्व पंचनामे शंभर टक्के पूर्ण करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.https://maharashtramirror.com/ Mumbai news

विभागनिहाय प्रगती: छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 68 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्याखालोखाल पुणे विभागात 30 टक्के आणि नाशिक विभागात 22 टक्के काम झाले असून, कोकण विभागात हे प्रमाण सध्या सर्वात कमी आहे.

'केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल होणार; 17 हजार कोटींच्या मदतीचा प्रस्ताव'

राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष पथकाची स्थापना केली आहे. मुक्तानंद अगरवाल यांच्या नेतृत्वाखालील हे केंद्रीय पथक पुढील 4 ते 5 दिवसांत महाराष्ट्रात येऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. संकटसमयी राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून, केंद्र सरकारकडे दुष्काळी मदतीसाठी तब्बल 17 हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

'19 तालुक्यांसह इतर तालुक्यांवरही परिस्थिती पाहून निर्णय'

265 तालुक्यांव्यतिरिक्त इतर प्रभावित तालुक्यांचाही दुष्काळात समावेश केला जात असल्याचे सांगत कृषिमंत्री म्हणाले, "ज्या 19 तालुक्यांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक नुकसान होऊनही ते निकषात बसत नव्हते, त्यांचा पुनर्विचार केला जात आहे. याशिवाय राज्यातील उर्वरित तालुक्यांतील पिकांची बिकट परिस्थिती पाहून पुढील योग्य तो निर्णय घेतला जाईल. राज्यात पिके पूर्णपणे करपली असल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे."

'महिला शेतकरी धोरणाला उदंड प्रतिसाद; 33 लाख अर्ज दाखल'

राज्य सरकारने 17 सप्टेंबरपासून लागू केलेल्या 'महिला शेतकरी धोरण' योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत राज्यातील 33 लाख महिला शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज केले असून, सर्वाधिक 2 लाख अर्ज एकट्या यवतमाळ जिल्ह्यातून प्राप्त झाल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें