मुख्य सामग्री पर जाएँ

Delhi News : महाराष्ट्रातील दुष्काळाची केंद्राकडून गंभीर दखल; ३ ऑक्टोबरला केंद्रीय पथके पाहणी करणार

Delhi News : नवी दिल्ली : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शनिवारी (दि.३ऑक्टोबर ) केंद्रीय पथके पाठविण्यात येणार आहेत.

वक
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

महाराष्ट्रातील दुष्काळाची केंद्राकडून गंभीर दखल; ३ ऑक्टोबरला केंद्रीय पथके पाहणी करणार
महाराष्ट्रातील दुष्काळाची केंद्राकडून गंभीर दखल; ३ ऑक्टोबरला केंद्रीय पथके पाहणी करणार

Delhi News : नवी दिल्ली : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शनिवारी (दि.३ऑक्टोबर ) केंद्रीय पथके पाठविण्यात येणार आहेत. केंद्रीय कृषिमंत्री "शिवराज सिंह चौहान" यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे झालेल्या ‘राष्ट्रीय रब्बी मोहीम २०२६’ परिषदेत ही माहिती दिली. आपणही पथकासह दोन्ही राज्यांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Delhi News

महाराष्ट्रातील दोन-तृतीयांश भागावर दुष्काळाचे सावट


महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना चौहान यांनी राज्यातील जवळपास दोन-तृतीयांश भागाला दुष्काळाचा फटका बसल्याचे सांगितले. कर्नाटकातही पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतीसाठी उपलब्ध पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे सुरू असलेल्या खरीप हंगामाबरोबरच आगामी रब्बी हंगामाच्या नियोजनासमोरही आव्हान उभे राहिले आहे. https://maharashtramirror.com/ Delhi News

रब्बीसाठी ‘पाण्याचे बजेट’ करण्याच्या सूचना


रब्बीची पेरणी करण्यापूर्वी उपलब्ध सिंचनाचे पाणी आणि जमिनीतील ओलावा याचा अंदाज घेण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना दिल्या आहेत. ज्या भागांत पाण्याची कमतरता आहे, तेथे अधिक पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या भागांत गव्हाऐवजी हरभरा, मसूर आणि गळितधान्यांसारख्या पिकांचा विचार करण्याच्या सूचना आहेत. पुरेसे सिंचन असलेल्या भागांतच अधिक पाणी लागणाऱ्या पिकांचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे.
भात कापणीनंतर पडीक राहणाऱ्या जमिनीत कडधान्ये आणि गळितधान्यांचे क्षेत्र वाढविण्याचेही नियोजन आहे. हरभरा, मसूर आणि मोहरीच्या उत्पादनासाठी उद्दिष्ट निश्चित करून सरकारी खरेदीची यंत्रणा सक्षम ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

खरीप उत्पादनावरही परिणामाची शक्यता


दुष्काळाचा परिणाम आगामी रब्बी हंगामासोबतच सध्या सुरू असलेल्या खरीप पिकांवरही होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे चौहान यांनी सांगितले.
जमिनीतील ओलावा कमी झाल्यास पिकांची उगवण आणि वाढ प्रभावित होऊन उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाण्याची उपलब्धता आणि जमिनीतील ओलावा लक्षात घेऊन पुढील पीक नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

३ ऑक्टोबरला केंद्रीय पथकांची पाहणी


महाराष्ट्र आणि कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीचे प्रत्यक्ष मूल्यांकन करण्यासाठी ३ ऑक्टोबरला केंद्रीय पथके दोन्ही राज्यांत दाखल होणार आहेत. या पाहणीत दुष्काळाची तीव्रता, पिकांची स्थिती, संभाव्य नुकसान आणि पाण्याची उपलब्धता याचा आढावा घेतला जाणार आहे. चौहान स्वतःही दोन्ही राज्यांचा दौरा करणार आहेत. दरम्यान, राज्यांना पिकांची स्थिती, पेरणी, उगवण, बाजारभाव आणि किडींचा प्रादुर्भाव यावर दर आठवड्याला लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिस्थितीत बदल झाल्यास तातडीने उपाययोजना करता याव्यात, यासाठी नियमित निरीक्षणावर केंद्राने भर दिला आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें