Pune News : लुल्लानगर येथे सुराणा बिल्डर्सचा बेजबाबदारपणा
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : लुल्लानगर परिसरात सुराणा बिल्डर तर्फे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी शुक्रवारी (दि.
1 मिनट पठन

Pune News : स्लॅब कोसळली, सुरक्षेचे उपाय नाहीत, बांधकामामुळे नागरिकांच्या जीवाला धोका; स्थानिकांची परवाना रद्द करण्याची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : लुल्लानगर परिसरात सुराणा बिल्डर तर्फे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी शुक्रवारी (दि. १८) संध्याकाळी वरच्या मजल्यावरचा स्लॅब थेट खाली कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु या बेजबाबदारपणामुळे भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. maharashtramirror.com Pune News
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा जाळी, बॅरिकेडिंग लावलेले नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या, लहान मुलांच्या जीवाची पर्वा न करता मटेरियल वरून खाली टाकले जाते. हा प्रकार पहिल्यांदाच घडला नसून यापूर्वीही अशाच प्रकारे स्लॅब / सेंट्रींग कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.maharashtramirror.com Pune News
कायद्याचे उल्लंघन
हे बांधकाम पुढील कायद्यांचे सर्रास उल्लंघन करत आहे: भारतीय न्याय संहिता २०२३ - कलम १२५: निष्काळजीपणामुळे मानवी जीवाला धोका निर्माण करणे.
बांधकाम कामगार कायदा १९९६: कामगारांना सुरक्षा साधने न देणे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम: PMC च्या बांधकाम परवानगीच्या अटींचे उल्लंघन.
नागरिकांची मागणी
याबाबत परिसरातील जागरूक नागरिकांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले असून पुणे महानगरपालिका (बांधकाम विभाग) आणि कोंढवा / वानवडी पोलीस स्टेशन यांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. त्यांनी पुढील मागण्या मांडल्या आहेत: सदर बांधकाम साइटची तात्काळ पाहणी करून काम थांबवण्याची नोटीस द्यावी. संबंधित बिल्डरचा बांधकाम परवाना तात्पुरता रद्द करून स्ट्रक्चरल ऑडिट करावे. या घटनेचा पंचनामा करून निष्काळजीपणाबद्दल गुन्हा दाखल करावा. जोपर्यंत पूर्ण सुरक्षा व्यवस्था होत नाही तोपर्यंत काम सुरू करण्यास परवानगी देऊ नये. जर प्रशासनाने वेळीच कारवाई केली नाही, तर संबंधित नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.
