मुख्य सामग्री पर जाएँ

Delhi News : लालकृष्ण अडवाणी यांना छातीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

Delhi News : नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना छातीच्या संसर्गाचा त्रास झाल्याने दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

लालकृष्ण अडवाणी यांना छातीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर
लालकृष्ण अडवाणी यांना छातीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

Delhi News : नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना छातीच्या संसर्गाचा त्रास झाल्याने दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ९८ वर्षीय अडवाणी यांना शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, फुफ्फुसविकार विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अडवाणी यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून आणि राजकीय वर्तुळातून चिंता व्यक्त केली जात आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच ७ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान मोदी यांनी सरकारप्रमुख म्हणून २५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर अडवाणी यांचे आशीर्वाद घेतले.

नरेंद्र मोदी यांनी २००१ मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. पुढे देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला.

या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत अडवाणी यांच्या योगदानाचा गौरव केला होता. अनेक दशकांच्या सार्वजनिक सेवेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय जीवनावर अमिट ठसा उमटवला असून, भारताच्या प्रगतीत आणि देशाला अधिक बळकट करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे, असे मोदी यांनी नमूद केले होते.

भाजपचे तीन वेळा राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले


लालकृष्ण अडवाणी हे भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी तीन वेळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले. त्यांचा पहिला कार्यकाळ १९८६ ते १९९०, दुसरा १९९३ ते १९९८ आणि तिसरा २००४ ते २००५ असा होता.

त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा जनाधार मोठ्या प्रमाणात वाढला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमध्ये अडवाणी यांनी १९९८ ते २००४ या काळात केंद्रीय गृहमंत्री म्हणून, तर २००२ ते २००४ या काळात देशाचे उपपंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदही भूषविले.

देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव


भाजपच्या राजकीय वाटचालीत लालकृष्ण अडवाणी यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. राम मंदिर आंदोलनातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून दूर आहेत.

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्याच वर्षी लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

देशाच्या राजकारणात अनेक दशके महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अडवाणी यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें