Pune News : लिंबाचा भाव कडाडला; किरकोळ बाजारात एका लिंबासाठी १० रुपयांपर्यंत मोजावे लागणार
पुणे : पावसाळ्यात लिंबाची आवक घटल्याने आणि मागणी वाढल्याने दरात मोठी वाढ झाली आहे.
1 मिनट पठन

Pune News : लिंबाचा भाव कडाडला; एका लिंबासाठी १० रुपयांपर्यंत मोजावे लागणार
पुणे : पावसाळ्यात लिंबाची आवक घटल्याने आणि मागणी वाढल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडच्या किरकोळ बाजारात एका लिंबासाठी ७ ते १० रुपये मोजावे लागत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
पुणे मार्केट यार्डात सप्टेंबरच्या मध्यात १५ ते २० किलोच्या गोणीचा दर ५०० ते २,७०० रुपयांवरून ७०० ते ३,००० रुपयांपर्यंत वाढला. गणेशोत्सवामुळे मागणी वाढल्यानेही दरावर परिणाम झाला.https://maharashtramirror.com/ Pune News
हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते आणि घरगुती ग्राहकांकडून लिंबाची मागणी कायम असल्याने दर वाढले आहेत. मुंबईतील वाशी बाजारातही सप्टेंबरअखेरीस किरकोळ दर १० रुपये प्रतिनगापर्यंत पोहोचल्याचे वृत्त आहे.
मात्र, २८ सप्टेंबरला पुणे बाजारात आवक वाढल्यानंतर गोणीमागे ३०० ते ४०० रुपयांनी दर कमी झाले. आगामी काळात आवक वाढल्यास लिंबाचे दर आणखी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कोट
आज (बुधवारी) पुणे मार्केट यार्डात लिंबाचे दर ५० ते १०० रुपये किलो आहेत. मध्यंतरी लिंबाची आवक घटल्याने दरात वाढ झाली होती. मात्र, आता बाजारात लिंबाची आवक हळूहळू वाढत असल्याने दर काही प्रमाणात स्थिर होऊ लागले आहेत. किरकोळ बाजारात मात्र लिंबाच्या आकारमानानुसार आणि गुणवत्तेनुसार दरात फरक पाहायला मिळत आहे.
विलास भुजबळ, भाजी व्यापारी, मार्केट यार्ड
